पाटणा | देशात सगळीकडे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. दररोज कोणत्याना कोणत्या भागात हत्या केल्याच्या, हाणामारीच्या घटना घडल्याचं समोर येतं आहे.
यादरम्यान महिलांर बलात्कार होण्याचंही प्रमाण वाढत चालल आहे. अशातच बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली असल्याची माहीती समोर आली आहे. वृद्धाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तो वृद्ध व्यक्ती 60 वर्षाचा असून अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक देत, तिच्यावर दोन महिने बलात्कार करत होता. याविरोधात अल्पवयीन तरूणीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.
मिळालेल्या माहितीनूसार बिहारमधील गयामधील तरूणी ज्या गावात राहत होती. त्या गावातील 60 वर्षीय वृद्दाने तिच्यावर बलात्कार केला आहे. या आरोपीचे नाव आशिक मियां असून हा त्या तरूणीला चाकूचा धाक दाखवत धमकावत असायचा. तसेच त्या तरूणीला जीवे मारण्याचीही धमकी द्यायचा. याच भितीने तरूणी आतापर्यंत गप्प राहिली असल्याचं तिनं तक्रार करताना पोलिसांना सांगितलं.
तसेच आरोपी त्या अल्पवयीन मुलीवर सतत दोन महिने बलात्कार करत होता. त्यामुळे ती तरूणी गर्भवती राहिली. यामुळे तिच्या घरच्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर या सगळा प्रकार उघडकीस आला असल्याची माहिती समजतं आहे.
अल्पवयीन तरूणीने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन केलेल्या तक्रारीवरून आरोपी आशिक मियांला अटक केली असल्याची माहिती पोलीस स्टेशनच्या प्रभारी रविरंजना यांनी दिली आहे.
त्याचप्रमाणे तरूणीची वैद्यकीय चाचणी करून या प्रकारणाचा आणखीन तपासही सुरू केला असल्याचीही माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
कोरोना योद्धाच्या समर्थनार्थ आयटीबीपी जवानाने वाजवलं…
हृदयाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ! चेकपोस्टवरील अपघातात तरुणाचा…
चर्चा तर होणारच! ‘या’ विद्यार्थ्यानं बनवला…
कौतुकास्पद! मोठ्या पगाराची नोकरी सोडून महिला स्मशानात करतेय…
धक्कादायक! कोरोना नष्ट करण्यासाठी देवाला सोडलेल्या घोड्याचा…