ठाणे | महाविकास आघाडीच्या प्रयोगाने राज्याच्या मुख्यमंत्रिपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विराजमान झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या विचोरधारेचे पक्ष राज्याचा गाडा हाकत आहेत.
बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेना सत्तेत असो वा विरोधात असो प्रत्यक्ष राजकारणात न येण्याचा आपला अलिखीत नियम मात्र कायम राखला. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर मात्र ठाकरे परिवाराचा तो नियम मोडला गेला.
राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या रूपानं पहिल्यांदा ठाकरे घराण्यातील व्यक्ती प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरली. पण निकालानंतर सर्व समीकरणं बदलली आणि उद्धव ठाकरेंना राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली.
ठाकरे कुटुंबातील पिता-पुत्र सत्तेचा भाग होण्याअगोदर शिवसेनेच्या सत्तेची सर्व सुत्र धर्मवीर आनंद दिघेंचे राजकीय वारसदार आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होती.
उद्धव ठाकरेंच्या सत्तेत सहभागी होण्यानं एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री होण्याची संधी हुकल्याची टीका भाजपनं अनेकदा केली आहे. पण आता ठाण्यातील एका पोस्टरची राज्यभरात चर्चा होताना दिसत आहे.
ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बॅनर लावण्यात आले आहेत. एकनाथ शिंदेंचा वाढदिवस हा 9 फेब्रुवारीला असतो. त्याअगोदरच ठाण्यात बॅनर लावण्यात आला आहेत.
एका बॅनरवर एकनाथ शिंदेंचा उल्लेख चक्क भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. परिणामी राज्याच्या राजकारणात सध्या या बॅनरबाजीची अधिक चर्चा होताना दिसत आहे. एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो या बॅनरवर आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांना ठाकरे कुटुंबानंतर शिवसेनेतील वर्चस्व असलेला नेता मानलं जातं. तळागाळातील लोकांसोबत असलेले त्यांचे संंबंध आणि लोकाभिमुख नेतृत्व अशी त्यांची ओळख राज्याच्या राजकारणात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“तुम्ही मोठं पाप केलंय”; संसदेत नरेंद्र मोदींचे ठाकरे सरकारवर गंभीर आरोप
संसदेत नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले “टुकडे टुकडे गँगची लीडर…”
भाजप खासदाराला आला मुलीचा ‘न्यूड व्हिडीओ काॅल’ अन्…
निळी साडी अन् लाल ब्लाऊज… राजेश्वरी खरातचा ‘हा’ हॅाट डान्स तुफान व्हायरल!
“तुमची हिम्मत कशी झाली?”; लतादीदींसाठी बाळासाहेबांनी थेट गुलशन कुमारांना झापलं