मुंबई | पीएमएलए न्यायालयाने सोमवारी मंत्री नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली. नवाब मलिक आता 18 एप्रिलपर्यंत तुरुंगात राहणार आहेत.
कोर्टाने घरचं जेवण आणि औषधांसाठी परवानगी दिली आहे. न्यायालयीन कोठडीदरम्यान त्यांना बेड, गादी आणि खुर्ची देण्याची विनंती मान्य करण्यात आली होती.
माफिया डॉन दाऊद इब्राहिम कासकरचा समावेश असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 23 फेब्रुवारी रोजी मलिक (62) याला अटक केली होती.
कोठडीत राहिल्यानंतर मलिक यांनी ईडीचा खटला रद्द करण्यासाठी गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र त्यांची याचिका फेटाळण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मलिक यांना त्यांच्या खात्यातून आणि दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून मुक्त करण्याचा निर्णय घेतला, जो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इतर मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना देतील.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. आपली अटक पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे.
रम्यान, मलिक यांच्यावर झालेले आरोप खोटे असल्याचा दावा मलिक यांच्या कुटुंबीयांनी आणि राष्ट्रवादीने केला आहे. राजकीय सूडबुद्धीतूनच मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोपही राष्ट्रवादीने केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चीनने पुन्हा जगाचं टेंशन वाढवलं, अत्यंत धक्कादायक बातमी समोर
“कट कारस्थानाच्या छाताडावर पाय ठेवून मुंबई पालिका जिंकू”
सर्वात मोठी बातमी! HDFC ने केली ‘ही’ महत्त्वाची घोषणा
जिओचा धमाका प्लॅन; 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत फ्री कॉलिंग आणि बरंच काही…