काँग्रेस नेत्यांना मोठा झटका, पक्षाने घेतला हा महत्वाचा निर्णय

जयपूर | काँग्रेसमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. सध्या पक्षातील संघटनात्मक नियुक्त्यांच्या अटकळांना पूर्णविराम मिळाला आहे. संघटनात्मक निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्त झालेले संजय निरुपम यांनी सध्या पक्षात संघटनात्मक नियुक्त्या होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

पक्षात ब्लॉक आणि जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या थांबल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीच्या दुसऱ्या यादीची प्रतीक्षा होती. मात्र, याला अपवाद म्हणून काही नियुक्त्या होऊ शकतात, असं मानलं जात आहे.

पक्षातील पदे नियुक्त्यांद्वारे भरली जाणार नसून निवडणुकीद्वारे भरली जाणार असल्याचंही संजय निरुपम यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झालं आहे. राज्यात काँग्रेस संघटनेच्या अंतर्गत 42 जिल्हे आहेत. यापैकी 13 जिल्ह्यांमध्ये नुकत्याच अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. संघटनेत अद्याप 29 जिल्ह्यांतील नियुक्त्या बाकी आहेत.

संघटनात्मक निवडणुकीसंदर्भात पहिली बैठक मंगळवारी प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात झाली. या बैठकीत संजय निरुपम यांच्यासह पीसीसी प्रमुख गोविंद सिंग दोतासरा आणि सचिन पायलट उपस्थित होते. यासोबतच अनेक मंत्री, आमदार आणि अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत संघटनात्मक निवडणुकीच्या आराखड्यावर चर्चा करण्यात आली.

राहुल गांधी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या प्रश्नावर संजय निरुपम म्हणाले की, संघटनात्मक निवडणुकांचे प्रभारी असल्याने पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होईल हे सांगू शकत नाही. मात्र, त्यांनी राहुल गांधींकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. बैठकीत संघटनात्मक निवडणुकांसह इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.

विशेष म्हणजे गेहलोत सरकार स्थापन होऊन तीन वर्षे झाली आहेत. गेल्या तीन वर्षांत मोठ्या राजकीय नियुक्त्याही झाल्या नाहीत. राज्य स्तरापासून ते तहसील स्तरापर्यंत हजारो पदांवर राजकीय नियुक्त्या करायच्या आहेत. पक्षाचे कार्यकर्तेही या नियुक्त्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! एअर इंडियानंतर आणखी एक सरकारी कंपनी होणार रतन टाटांची 

‘धोका टळलेला नाही…’; WHO ने दिला अत्यंत गंभीर इशारा 

‘असं रक्तरंजित राजकारण कोकणात कधीच नव्हतं’; केसरकरांचा राणे पितापुत्रांवर हल्लाबोल!

“यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे जुन्यांना मूठमाती आणि नव्यांना गाजर दाखवणारा आहे”

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मोदी सरकारनं उचललं मोठं पाऊल