मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का; शूटिंग संपवून घरी येताच ‘या’ अभिनेत्याचा मृत्यू

मुंबई | प्रसिद्ध बंगाली अभिनेते अभिषेक चॅटर्जी (Abhishek Chatrjee) यांचं दुःखद निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 56 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

टॉलिवूड म्हणजेच बंगाली टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार अभिषेक चॅटर्जी हे बुधवारी रात्री शूटिंगवरून परतल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं.

घरी आल्यानंतर त्यांना उलट्या झाल्या, मात्र त्यांनी रुग्णालयात जाण्यास नकार दिला. त्यांनतर त्यांना घरीच सलाईन लावण्यात आलं. मात्र, त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेने मनोरंजनसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

अभिषेक चॅटर्जी हे बंगाली टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय चेहरा होता. त्यांनी ‘इच्छादी’, ‘पिता’, ‘अपूर सांगा’, ‘अंदरमहल’, ‘कुसुम डोला’, ‘फागुन बू’, ‘खारकुटो’ यांसारख्या मालिकांमधील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने बंगालच्या मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“आम्ही सत्तेत बसवायचं आणि तुम्हीच आमच्यावर अन्याय करायचा” 

लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर! 

‘गरज सरो, वैद्य मरो’; संजय राऊत मोदी सरकारवर बरसले 

“पंडित नेहरुंच्या त्या चुकीचे परिणाम आजही देश भोगतोय” 

बंडा तात्यांकडून महात्मा गांधींचा म्हातारा म्हणून उल्लेख, म्हणाले…