सर्वसामान्यांना पुन्हा एकदा मोठा झटका; मसाल्यांसह ‘या’ वस्तू महागल्या

मुंबई | रशिया-युक्रेन युद्धानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत. इंधन दर वाढल्यामुळे माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं महाग पडतं आहे. याचा परिणाम दैनंदिन वस्तूंच्या किमतीवर होत आहे.

सर्वसामान्यांना आता पुन्हा एकदा झटका बसणार आहे. आता दररोजच्या खाण्या-पिण्याच्या वस्तूंमध्ये वाढ झाली आहे.

साबण, बिस्किट, कॉफी, डिटर्जेंट पावडर अशा दररोज लागणाऱ्या वस्तूंचे दर वाढले आहेत.

साबण आणि डिटर्जेंटचे दर 3 ते 4 टक्क्यांनी वाढवले आहेत. हिंदुस्तान यूविलिव्हरने मागील 6 महिन्यात आपल्या वस्तूंच्या किमतीत 30 ते 40 टक्क्यांची वाढ केली आहे.

भारतातील सर्वात मोठी बिस्किट कंपनी ब्रिटानिया (Britannia) यावर्षी आपल्या बिस्किटांच्या किमतीत 7 टक्क्यांची वाढ करू शकते.

ब्रू गोल्ड कॉफी जार तीन-चार टक्क्यांनी आणि ब्रू इन्स्टंट कॉफी पाऊच 3 ते 6.66 टक्क्यांनी महागले आहेत.

ताजमहाल चहाची किंमतही 3.7 वरून 5.8 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ब्रुक बाँडच्या विविध प्रकारांच्या किमती 1.5 ते 14 टक्क्यांनी वाढवण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

UPA च्या अध्यक्षपदाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

‘…तर मी राजकारण सोडेन’; जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना ओपन चॅलेंज 

“शरद पवारांवर टीका केल्या शिवाय यांना हेडलाईन मिळत नाही” 

“भाजपची एकट्याची डाळ शिजत नाही, म्हणून मनसे त्यांची बी टीम बनलीये” 

“राज ठाकरे यांच्या इतका सरडा पण रंग बदलत नाही”