राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

रायगड | रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार सुरेश लाड यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

आमदार सुरेश लाड यांनी प्रकृतीचं कारणामुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलंय. कर्जत मतदारसंघात शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे विरुद्ध माजी आमदार सुरेश लाड असा संघर्ष अनेकदा पाहायला मिळाला आहे.

याच संघर्षामुळे कर्जत मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचं समीकरण जुळताना दिसत नाही. एकीकडे लाड यांचा थोरवे यांच्याविरुद्ध संघर्ष पाहायला मिळालेला आहे तर दुसरीकडे सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चेत होतं.

सुरेक्ष लाड यांची रायगड जिल्ह्यातील राजकारणावर चांगलीच पकड आहे. जिल्ह्यातील कर्जत मतदारसंघात ते 2009 आणि 2014 असे सलग दोन वेळा निवडून येत विधानसभेत दाखल झाले होते. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला.

लाड यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी राष्ट्रवादी पक्षविस्तार करण्यासाठी प्रयत्न करताना ते दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी उल्हासनगरापासून ते मराठवाड्यातील परभणीपर्यंत अनेक नेते तथा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

उल्हासगनरात माजी आमदार पप्पू कलानी यांनी 23 नगरसेवकांसह राष्ट्रवादीत घरवापसी केली. कलानी यांच्या प्रवेशामुळे उल्हासगनरात राष्ट्रवादीला चांगलेच बळ मिळालं आहे.

तर दुसरीकडे 11 नोव्हेंबर रोजी परभणी जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला होता.

सोनपेठ नगरपरिषदेचे गटनेते चंद्रकांत राठोड यांच्यासह 6 नगरसेवकांनी राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या मनगटावर बांधलं होतं. तर याच दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील अर्णी विधासभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम यांनीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

“2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष करायचाय” 

देवेंद्र फडणवीसांना पाहून काँग्रेसच्या आमदारानं काढला पळ, मोठं कारण आलं समोर 

अण्णा हजारेंनी घेतला अजित पवारांचा धसका?, ‘या’ निर्णयाची रंगलीय खमंग चर्चा

‘हे तर तीन तिघाडा काम बिघाडा सरकार’; पंकजा मुंडेंचा घणाघात 

  नवाब मलिकांचा गौप्यस्फोट; क्रांती रेडकरचे ‘ते’ कथित चॅट केले शेअर