मोठी बातमी! डाॅ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणात महत्त्वाची माहिती आली समोर

पुणे | राज्यासह देशाला हादरवून टाकणारी घटना 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात घडली होती. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांची हत्या करण्यात आली होती.

दाभोळकरांच्या हत्येनं सांस्कृतिक महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणावर मोठा आघात केला होता. त्यानंतर पोलिसांनी आपला तपास चालू केला.

तब्बल 9 वर्षांनी आता या प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. न्यायालयात प्रत्यक्षदर्शींनी मोठा जवाब नोंदवल्यानं प्रकरणाला आता गती आली आहे.

दाभोळकरांचा खून करणाऱ्या दोघांनाही प्रत्यक्षदर्शींनी ओळखलं आहे. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी ओळखलं आहे.

अंदुरे आणि कळसकर यांनीच दाभोलकरांवर गोळीबार केला आणि त्याठिकाणाहून पळून गेल्याचं साक्षीदारांनी म्हटलं आहे. परिणामी प्रकरणाला आता गती मिळाली आहे.

डाॅ. नरेंद्र दाभोळकरांची पुण्यात बालगंधर्व रंगमंदीराच्या जवळ असणाऱ्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर हत्या झाली होती. त्यावेळी त्या पुलावर दोन सफाई करणाऱ्या व्यक्ती बसल्या होत्या.

हल्लेखोरांनी एक व्यक्तीवर गोळ्या झाडल्या आणि बाजूलाच असलेल्या पोलीस चौकीच्या बाजूनं पळून गेले. त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात ती व्यक्ती पडल्याचं साक्षीदारांचं म्हणणं आहे.

दाभोळकर प्रकरणात आता पुढील सुनावणी 23 मार्च रोजी होणार आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली आहे.

दरम्यान, दाभोळकर प्रकरणानं राज्य सरकारला मोठा टीकेचा सामना करावा लागला होता. या प्रकरणात लवकर निकाल येण्याची अपेक्षा केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “मी येतोय म्हटल्यावर निवडणुकीत रंग येतो, माझ्या इमेजचा फायदा…”

 आप करणार बेरोजगारी साफ! पंजाब सरकारनं युवकांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

 नारायण राणेंच्या अडचणीत पुन्हा वाढ; BMCनं दिला ‘हा’ मोठा दणका

 मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी करा ‘या’ योजनेत गुंतवणूक, मिळतील इतके लाख रूपये

 “पावसात शरद पवार भिजले आणि निमोनिया भाजपला झाला”