Top news

Gold Silver Rate: सोने-चांदी दरात मोठी घसरण, वाचा काय आहे आजचा भाव

gold 6 e1618323928184
Photo Credit- Pixabay

मुंबई | आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Rate) चढउतार होताना दिसत होतं. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर दिसला.

गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीचे भाव वाढलेले होते. आज शुक्रवारी कमॉडिटी बाजारात मोठी घट पहायला मिळालं आहे. त्यामुळे आता भारतीय सोनं चांदीच्या बाजारावर मोठा परिणाम होताना दिसत आहे.

एमसीएक्सवर आज मंगळवारी सोन्याचा भावामध्ये 116 रूपयांची घसरण झाली आहे. आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 51,228 रुपये इतका आहे.

चांदीच्या भावामध्ये आज जवळपास 173 रूपयांची घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीचा भाव 66,550 रुपये झाला आहे.

गेल्या काही आठवड्यात जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव 1,900 डॉलर प्रति औंस वाढला आहे. तसेच, स्पॉट गोल्डचा भाव 1886.63 डॉलर प्रती औंस झाला आहे.

दरम्यान, रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम थेट सोनं चांदीच्या किंमतीवर होताना दिसत आहे. तर आंतराष्ट्रीय बाजारात देखील चढ उतार होताना दिसतोय. त्यामुळे येत्या काळात सोनं स्वस्त होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयाचा झटका 

चीनने पुन्हा जगाचं टेंशन वाढवलं, अत्यंत धक्कादायक बातमी समोर 

“कट कारस्थानाच्या छाताडावर पाय ठेवून मुंबई पालिका जिंकू” 

सर्वात मोठी बातमी! HDFC ने केली ‘ही’ महत्त्वाची घोषणा 

जिओचा धमाका प्लॅन; 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत फ्री कॉलिंग आणि बरंच काही…