ऐन गुढीपाडव्याच्या सणाला सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा ताजे दर

नवी दिल्ली | सोनं हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोन्याचे दागिने घालून मिरवणं एवढंच नव्हे तर गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करण्याकडे भारतीयांचा मोठा कौल आहे. भारतातील लोकांला सोन्याच्या असलेल्या चाहतीमुळे भारतात सोन्याचा बाजार नेहमीच गरम असतो.

गेल्या काही आठवड्यांमध्ये सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने घट होताना पाहायला मिळत होती. सोन्याबरोबरंच चांदीच्या दरात देखील घट पाहायला मिळत होती. या घसरणाऱ्या सोन्या-चांदीच्या दरात या आठवड्यात पुन्हा वाढ अनुभवायला मिळाली होती. मात्र, आज ऐन गुढीपाढव्याच्या सणाला सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

आज सोन्याच्या दरात 130 रुपयांची घट झाली आहे. काल एमसीएक्सवर 24 कॅरेट सोन्याचा बाजार 46 हजार 223 रुपये प्रती तोळ्यावर बंद झाला होता. आज हाच दर 46 हजार 93 रुपये प्रती तोळ्यावर बंद झाला आहे. अशाप्रकारे आज सोन्याच्या दरात 130 रुपयांची घट झाली आहे.

तसेच चांदीच्या दरात देखील घट अनुभवायला मिळाली आहे. काल एमसीएक्सवर प्रती किलो चांदीचा दर 66 हजार 345 रुपये प्रती किलो होता. आज हाच दर 305 रुपयांच्या घटीसह 66 हजार 40 रुपये प्रती किलोवर बंद झाला आहे.

दरम्यान, मोदी सरकार सोन्याच्या बाबतीत लवकरंच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. मोदी सरकार सध्या ‘वन नेशन वन गोल्ड’ ही व्यवस्था संपूर्ण देशभरात लागू करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘वन नेशन वन गोल्ड’ या योजने अंतर्गत संपूर्ण देशभरात सोन्याचे भाव एकंच असतील. भारत देश इतर काही देशांकडून सोनं आयात करतो. देशात आयात केलं जाणाऱ्या सोन्याची किंमत जवळपास एकसारखीच असते. परंतु पुढे हीच किंमत भागानुसार बदलत जाते.

संपूर्ण देशभरात अनेक ज्वेलर्स असोसिएशन आहेत. प्रत्येक भागात बदलत जाणाऱ्या सोन्याच्या किंमती हेच असोसिएशन ठरवत असतात. यामुळे देशात विविध भागात गेल्यानंतर सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये देशात आपण जसजसे दक्षिणेकडे जावू तशा सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसली आहे. मात्र, याच सोन्याच्या किंमती आपण देशात उत्तरेकडे जाताना वाढताना दिसतात. दक्षिणेतील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून कमी मार्जिन व.सूल करतात. तर देशातील उत्तरेकडील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून जास्त मार्जिन घेतात.

देशातील अनेक ज्वेलर्स असोसिएशन सध्या मोदी सरकारकडे ‘वन नेशन वन गोल्ड’ ही योजना संपूर्ण देशभरात लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी करत आहेत. मोदी सरकार ज्वेलर्स असोसिएशनच्या या मागणीवर विचार करत असले तरी अद्याप सरकारने याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.

महत्वाच्या बातम्या-

सुनील शेट्टीची नक्कल करणाऱ्या प्रियकराला प्रियसीनं दिली लाथ, अन् मग…; पाहा मजेशीर व्हिडीओ

आपल्या पिलासाठी ‘या’ अस्वलाने फोडला टाहो! व्हिडीओ पाहून तुम्हालाही अश्रू अनावर होतील

‘या’ अभिनेत्रीनं मोराच्या जवळ जाण्याचं धाडस केलं पण चांगलंच अंगलट आलं, पाहा व्हिडीओ

पोलीस पतीला हॉटेलच्या खोलीत प्रियकरासोबत आढळली पत्नी, अन् मग…; व्हिडीओ व्हायरल

‘ही’ तरुणी चक्क नग्नावस्थेत डोंगर सर करते! जाणून घ्या काय आहे कारण?