गॅस सिलेंडर धारकांना आणखी एक झटका! सिलेंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ

नवी दिल्ली | आज बहुतेक घरांमध्ये एलपीजीचा वापर केला जातो. देशभरात करोडो लोकांच्या घरामध्ये स्वयंपाक बनवण्यासाठी एलपीजी सिलेंडरचा वापर केला जातो. मात्र, अलीकडे याच गॅस सिलेंडरचे भाव देखील गगनाला भिडले आहेत.

गेल्या काही महीन्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ पहायला मिळाली आहे. डिसेंबर महीन्यात सिलेंडरच्या दरात तब्बल 100 रूपयांची वाढ झाली होती. आता पुन्हा एकदा सिलेेेंडरच्या दरात 50 रूपयांची वाढ झाली आहे.

यापूर्वी सिलेंडरचे दर 719 रूपये इतके होते. या दरात आणखी 50 रूपयांची वाढ झाली आहे. एलपीजी ग्राहकांना आता अनुदानीत सिलेंडरसाठी जवळपास 769 रूपये मोजावे लागणार आहेत.

दरम्यान, दिवसेंदिवस एलपीजी गॅसच्या चोरीचं प्रमाण वाढतंच चाललं आहे. यालाच आळा घालण्यासाठी तेल कंपन्यांनी काही नवीन नियम लागू केले आहेत. याद्वारे ग्राहकांची ओळख पटवून सिलेंडर दिला जाणार आहे.

एलपीजी कंपनीनं आता Delivery Authentication Code ही नवीन पद्धत सुरु केली आहे. ज्या अंतर्गत ग्राहकांना सिलेंडर घ्यायचा असल्यास मोबाईलवर ओटीपी मिळेल त्याची सत्यता पडताळल्याशिवाय ग्राहकांना सिलेंडर मिळणार नाही.

यापूर्वी घरगुती गॅसचं फक्त बुकिंग केल्यास गॅस मिळत होता. मात्र, आता फक्त गॅसच्या बुकिंगवरच ही प्रक्रिया थांबणार नाही. त्यापुढेही गॅस सिलेंडर घेण्यासाठी आणखी प्रक्रिया करावी लागणार आहे. गॅस सिलेंडरचं बुकिंग झाल्यानंतर ग्राहकांना त्यांच्या रजिस्टर नंबरवर ओटीपी पाठवण्यात येईल.

हा ओटीपी ग्राहकांना सिलेंडर डिलिव्हरी करण्यासाठी जो व्यक्ती येईल त्याच्यासोबत शेअर करावा लागेल. ओटीपी मॅच झाल्यानंतरच ग्राहकांला सिलेंडर दिला जाईल. प्रथम DAC चा वापर देशातील 100 स्मार्ट शहरांमध्ये करण्यात येईल. सध्या दोन शहरांमध्ये हा पायलट प्रोजेक्ट चालू आहे.

महत्वाच्या बातम्या –

अबब… तब्बल 10 हजार रूपयांनी स्वस्त झालं सोनं!

‘….म्हणून तिने आत्मह.त्या केली’; पूजाच्या वडिलांनी सांगितले आत्मह.त्येमागचं ध.क्कादायक कारण