Uncategorized

सणासुदीच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात मोठी वाढ, वाचा आजचा दर

Photo Credit- Pixabay

मुंबई | आपल्या भारत देशात सोन्याला खूपच महत्व आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या दागिन्यांना त्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये दररोज चढ-उतार आपल्याला पाहायला मिळतं असतो. महिला मंडळींसाठी सोनं हे खूप जवळची गोष्ट असते.

बहुतेक लोक आपला पैसा हा सोन्यामध्ये गुंतवत असतात. तर काही सोन्याचे वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने बनवतात. मात्र आजच्या सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळतं आहे.

मंगळवार म्हणजेच 26 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 48 हजार 270 रूपये होता. तर आच त्यामध्ये 10 रूपयाची वाढ झाली असून, आज 27 ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव प्रति तोळा 48 हजार 280 रूपये झाला आहे.

तसेच काल चांदीचा प्रति किलोचा भाव 66 हजार रूपये होता. तर आज चांदीच्या किंमतीमध्ये 1000 रूपयांची घट झाली असून, आज प्रती किलो चांदीचा दर 65 हजार रूपये इतका झाला आहे.

तसेच पुण्यामध्ये 24 कॅरेटचा भाव प्रती तोळा सोन्याचा भाव हा 49 हजार 600 रूपये इतका असून, चांदीचा भाव प्रती किलो 65 हजार रूपये इतका आहे.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! स्टेजवर बोलत असतानाच काँग्रेस नेत्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

‘तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला’; चित्रा वाघ यांचं मलिकांना प्रत्युत्तर

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये ‘इतक्या’ रूपयांची वाढ, वाचा आजचा दर

“नवाब मलिकांचं दुःख वेगळं आहे, ते स्पष्टपणे समोर येतय”

“शिवसेनेचा इतिहास पाहा, नाव महाराजांचं घेतील पण काम मुघलांचं करतील”