नवी दिल्ली | कोरोना महामारीनं गेल्या दोन वर्षापासून हाहाकार माजवला आहे. यातच कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपली नाही. त्यामुळे अजूनही कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. असं असतानाच कोरोनाची तिसरी संभाव्य लाट येणार असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर लसीकरण करण्यास सांगितलं जात आहे. अशातच तिसऱ्या लाटेविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
कोरोनाची तिसरी संभाव्य लाट येणार असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला होता. मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेला हा इशारा एम्सच्या डाॅक्टरांनी फेटाळला आहे.
भारतामध्ये कोरोनाची कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट येऊन गेली आहे. या दोन्ही लाटांमध्ये कोट्यावधी लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे. त्यामुळे त्या लोकांमध्ये अॅन्टीबॉडी तयार झाल्या आहेत. याशिवाय लसीकरण मोहिमेलाही वेग आला आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता नाही, असं एम्सचे डॉक्टर आणि आरोग्यतज्ज्ञ डॉ. संजय रॉय यांनी सांगितलं आहे.
कोरोनाची तिसरी लाट येणार नसली तरी नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करावं. कारण कोरोनाचे नियम मोडल्यास कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यानंतर कोरोनाची संभाव्य लाट येण्याची शक्यता जास्त वाढेल.
कोरोना विषाणूच्या या बदललेल्या स्वरुपामुळे देशाला कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे.
कोरोना विषाणूमुळे सारं जग हवालदिल असताना रोज काही नवी माहिती समोर येत आहे. आता भविष्यकाळात कोरोना विषाणूचे आणखी व्हेरिएंट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताला कोविड लसीकरणासोबतच बूस्टर डोसची व्यवस्था करण्याची गरज आहे.
दरम्यान, भारतात कोरोनाच्या दोन्ही लाटांचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. दोन्ही वेळा राज्यात रुग्णसंख्येचे उच्चांक नोंदवले गेले. आता हळुहळू अनलॉक होत असताना तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन तयारी सुरू केली गेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना आणखी एक झटका
आर्यन खानला क्रुझवर कोणी नेलं?; नवाब मलिकांनी सांगितली ‘ती’ दोन नावं
“भाजपने सरकारी कंपन्यांप्रमाणे तपासयंत्रणा आणि तुरुंगांचंही खासगीकरण केलंय”
राकेश झुनझुनवाला यांनी सर्वांना दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…
“तुमचा परफॉर्मन्स दाखवा, नाहीतर तुमचं मंत्रिपद जाऊ शकतं”