Top news महाराष्ट्र मुंबई

भारतातील कोरोना स्थितीबाबत अमेरिकेतील तज्ज्ञांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

corona fight

मुंबई | कोरोना महामारीने संपूर्ण जग हादरून गेलंय. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने लाखो लोकांचा बळी घेतला आहे. संपूर्ण जग ओमिक्रॉनशी (Omicron-Covid19) झुंज देत आहे. अशात भारतातील कोरोनाच्या स्थितीबाबत अमेरिकेतील तज्ज्ञांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

एका मुलाखती दरम्यान, अमेरिकेच्या मिशिगन यूनिव्हर्सिटीच्या डेटा शास्त्रज्ञ भ्रमर मुखर्जी यांनी सांगितलं की, हा कोरोना व्हायरस कधीपर्यंत अशाच प्रकारचा हाहाकार माजवणार आहे.

जानेवारी अखेरीस कोरोना उच्चांक गाठेल आणि फेब्रुवारी अखेर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता, अमेरिकन तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

आपण जी कोरोना परिस्थिती देशात पाहत आहोत ती लोकांचा दृष्टीकोन बदलणारी आहे. दिल्ली, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत गेली. त्यामुळे हे पाहणे गरजेचं आहे की, पुढील 7 कींवा 8 दिवसांत कोरोनाची रुग्णसंख्या कमी होतं की नाही.

दिल्लीमधील पॉझिटीविटी रेट कमी झाला आहे. पुढील काही दिवसांत काही राज्यात कोरोना कहर वाढणार आहे. याशिवाय भारतात जानेवारीच्या शेवटी कोरोना हाहाकार माजवणार आहे. जंगलात लागलेल्या वणव्याप्रमाणे कोरोनाचा नवा व्हेरिएंट मोठ्या प्रमाणात पसरत आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर लसीकरण हा शेवटचा उपाय आहे. तरीही परिस्थिती दुसऱ्या लाटेपेक्षा खूप वेगळी आहे. वास्तविक, भारतात लसीकरणामुळे लोकांची प्रतिकारशक्ती बदलली आहे, असं त्यांनी म्हटलंय.

कोरोनाच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. मला खात्री आहे की, फेब्रुवारीपर्यंत भारतातील लाट संपेल, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘… तर घरीच उपचार घ्या’; जाणून घ्या सरकारच्या या मार्गदर्शक सूचना 

“पंतप्रधानांबद्दल बोलताना आपली उंची किती बोलतो किती, हा विचारही राऊतांनी करावा” 

राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून अलर्ट जारी 

मनसेला मोठा झटका; आता ‘हा’ नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश

-राज्यातून 191 ट्रेनद्वारे अडीच लाख परप्रांतीय कामगारांना स्वगृही पाठवलं- अनिल देशमुख