वॉशिंग्टन | सध्या अमेरिकेतील एक अभिनेत्री आणि मॉडेल असणारी श्यांटेल ग्याकेलोन खूप जास्त चर्चेत आहे. काही वर्षांपूर्वी श्यांटेलने एक बिस्कीट खालल्याने तिचा ब्रेन डॅमेज झाला होता. याचीच भरपाई म्हणून सध्या श्यांटेलला 29.5 मिलियन डॉलर म्हणजेच 222 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे.
2013 मध्ये श्यांटेल ग्याकेलोन एका लास वेगासमध्ये मॅजिक फॅशन ट्रेड शोमध्ये मॉडेलिंग करत होती. यावेळी श्यांटेलच्या एका मैत्रिणींने तिला योगर्ट आणि प्रेटजेल दिलं होतं. प्रेटजेल हे एक प्रकारचं बिस्कीट असतं आणि या बिस्किटमध्ये पिनट बटर देखील असतं. पण श्यांटेलला पिनट बटरची ऍलर्जी होती.
मात्र, श्यांटेलच्या मैत्रिणीला हे महित नव्हतं की श्यांटेलला पिनट बटरची ऍलर्जी आहे. तसेच श्यांटेलला देखील माहीत नव्हतं की त्या बिस्कीटमध्ये पिनट बटर आहे. यामुळे तिने देखील ते बिस्कीट खाललं. बिस्कीट खाताच श्यांटेलला ऍलर्जीची रिऍक्शन झाली.
यावेळी ती एनफायलेक्टिक शॉकमध्ये गेली होती. या शॉकमध्ये वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाचा जीव देखील जाऊ शकतो. रुग्णाला अशा स्थितीत epinephrin हे औषध तातडीने दिलं जातं. मात्र श्यांटेलला रुग्णालयात तातडीने हे औषध दिलं गेलं नाही. यामुळे तिची प्रकृती आणखी बिघडली.
श्यांटेलच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, श्यांटेलला यावेळी मेडीक्वेस्ट नावाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी तिचा मेंदू काही मिनिटांसाठी बंद पडला होता. अशाप्रकारे श्यांटेलला योग्य वेळी पॅरामेडिक्स योग्य उपचार देऊ शकले नाहीत त्यामुळे तिला 222 कोटी रुपयांची मदत देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
श्यांटेलच्या मानसिक आणि भावनिक गोष्टींचा विचार करता तिला ही नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. श्यांटेल सध्या 35 वर्षांची आहे. ती अजून देखील बरी झाली नाही. अजूनही तिला लकवा मारलेला आहे.
श्यांटेल दिवस रात्र आपल्या कुटुंबियांच्या देखरेखेखाली राहते. आय गेज कम्प्युटरच्या आधारे ती आपल्या आजूबाजूच्या लोकांशी संवाद साधते. सध्या ती पूर्णपणे कुटुंबावर आधारित आहे. श्यांटेलचे आईवडिलच तिची काळजी घेतात.
श्यांटेलला नुकसान भरपाई मिळावी म्हणून तिच्या कुटुंबाने खूप संघर्ष केला आहे. तब्बल 8 वर्षानंतर त्यांच्या संघर्षाला यश मिळालं आहे. यामुळे तिचा परिवार समाधानी आहे. मिळालेल्या पैशातून ते श्यांटेलची आणखी काळजी घेऊ शकतील.
महत्वाच्या बातम्या –
बर्फावर रॅम्प वॉक करायला गेला अन् चांगलाच आदळला, वाघाची फजिती पाहून हसू आवरणार नाही!
भर चौकात पोलिसांनी जोडप्यावर गोळीबार केला! पाहा नेमकं काय घडलं?
IPL 2021: ….म्हणून अभिनेता शाहरुख खाननं मागितली केकेआरच्या चाहत्यांची माफी
अभिनेत्री नोरा फतेही आणि माधूरीनं केला ‘या’…
भल्या मोठ्या सिंहाने त्यांच्या अंगावर झेप घेतली अन्…