काँग्रेसला जोर का झटका; ‘हा’ मोठा चेहरा लवकरच काँग्रेसचा हात सोडणार

नवी दिल्ली | मागील 5 वर्षापासून काँग्रेसला गळती लागल्याचं पहायला मिळत आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशातच आता काँग्रेसला आणखी एक धक्का बसल्याचं पहायला मिळत आहे.

काँग्रेसच्या महिला नेत्या बिस्मिता गोगोई लवकरच भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश होणार आहे. बिस्मिता गोगोई यांनी नुकतीच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची गुप्तपणे भेट घेतल्याची माहिती समोर आली होती.

बिस्मिता गोगोई यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्या लवकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यानंतर आता त्या काँग्रेसचा हात सोडणार असल्याचं स्पष्ट झालंय.

बिस्मिता गोगोई यांच्या जाण्याने काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस सरकारच्या काळात त्या मंत्रीपदावर होत्या. त्यामुळे आता काँग्रेसला येत्या काळात समीकरण बदलावी लागणार आहेत.

दरम्यान, आगामी 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मोठी रणनीती तयार करत असताना काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसल्याचं पहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आत्ताची मोठी बातमी! तब्बल 18 दिवसानंतर गुणरत्न सदावर्ते जेलबाहेर, सुटकेनंतर म्हणाले…

Elon Musk ट्विटरचे नवे मालक झाल्यानंतर CEO पराग अग्रवालने दिला ‘हा’ गंभीर इशारा

“मी दहावीत दोनदा नापास झालो पण…”, नागराज मंजुळेंची पोस्ट चर्चेत

अनिल देशमुखांना दिलासा मिळणार?, चांदीवाल आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर

‘साहेबांसमोर सांगतोय, मला विक्रम काळेंची भीती वाटते’; अजित पवारांची जोरदार फटकेबाजी