पुणे | पुणे रेल्वे स्थानक परिसरात बाॅम्ब सदृश्य वस्तू सापडल्यानं सध्या या परिसरासह पुण्यात चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
पोलिसांनी बाॅम्ब शोधक पथकासह जिलेटीनच्या कांड्या आहेत का?, यावर शोध मोहिम चालू केली आहे. सध्या या परिसरातून नागरिकांना हलवण्यात येत आहे.
प्लॅटफाॅर्म क्रमांक 1 आणि प्लॅटफाॅर्म क्रमांक 2 रिकामा करण्यात आला आहे. सर्व रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे. प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे रेल्वे स्थानक परिसरात दाखल झाले आहेत. तसेच पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक देखील परिसरात दाखल झाले आहेत.
साडेदहा वाजण्याच्या सुमारास बाॅम्ब सदृश्य वस्तू सापडल्यानं गोंधळ उडाला होता. त्यानंतर प्रशासनानं तातडीनं पोलीसांच्या सहाय्यानं परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.
संशयित वस्तू पोलिसांनी मोकळ्या मैदानात नेली आहे. त्यावर आता प्रयोगशाळेची टीम पाहणी करत आहे. असं असलं तरी रेल्वे स्थानकावर कोणालाही जावू दिलं जात नाहीये.
दरम्यान, बाॅम्ब सदृश्य वस्तू ही नेमकी काय आहे हे अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘मनी लाॅंड्रिंग प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी होणार’; भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
कोण होणार ‘IPL 2022’ चा बादशहा?, दोन संघ बाहेर पडताच आठ संघांमध्ये चुरस
‘किधर छुप्या है अमित ठाकरे…’; दिपाली सय्यद यांची राज ठाकरेंवर टीका
“ज्यांना घरातून बाहेर काढलं, त्यांच्यावर काय बोलू?, त्यांची लायकी नाही”
बाथरूममध्ये SEX करण्याची इच्छा जीवावर बेतली; अत्यंत धक्कादायक प्रकार समोर