काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; इंदौरवरून अमळनेरला येणारी बस नर्मदा नदीत कोसळली, 13 जणांचा मृत्यू

इंदौर | इंदौरवरून अमळनेरला येत असलेल्या एसटी महामंडळाच्या बसचा सोमवारी मध्य प्रदेशात अपघात झाला. यामध्ये 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. धार जिल्ह्यातील घागरगाव येथे ही बस थेट नर्मदा नदीत कोसळली.

मध्य प्रदेशातील खलघाटजवळ सोमवारी सकाळी प्रवासी बस दुर्घटनाग्रस्त झाली. 55 प्रवाशांना घेऊन जळगाव जिल्ह्यातील अमळनेरकडे येत असलेली बस खरगोन आणि धार जिल्ह्याच्या सीमेवर पुलावरून नर्मदा नदीपात्रात कोसळली.

13 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर 15 जण जखमी अवस्थेत आढळले. बाहेर काढण्यात आलेल्या प्रवाशांपैकी 5 ते 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या एसटी बसमध्ये महाराष्ट्रातील नेमके किती आणि कोणते प्रवासी याची माहिती अद्याप आमच्याकडे नाही. आम्ही लवकरच सविस्तर माहिती देऊ. तसेच मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबीयांना माहिती घेण्यासाठी हेल्पलाईनही सुरु करण्यात येईल, अशी माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे.

नर्मदा नदीच्या पुलावर ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. तपासानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल. ते म्हणाले की, नदीचा प्रवाह अतिशय वेगवान आहे. बसमध्ये 50 ते 55  जण होते, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे.

सध्या धार जिल्ह्यात नर्मदा नदीत एसटीतील उर्वरित प्रवाशांन वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु आहे. आम्ही या सगळ्याबाबत लवकरच सविस्तर माहिती देऊ, असं एसटी महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘मला पण गुवाहाटीला फिरायला न्यायचं हं’, चिमकुलीचा थेट मुख्यमंत्र्यांकडे हट्ट; पाहा व्हिडीओ 

‘गोल्ड डिगर’ म्हणणाऱ्यांना सुष्मिता सेनचं सडेतोड उत्तर, म्हणाली…

….अन् किशोरी पेडणेकरांंनी ते प्रेमपत्रच खाल्लं, पेडणेकरांच्या प्रेमकहाणीतील भन्नाट किस्सा

“शरद पवारांची राजकीय जीवनातील 60 टक्के वर्ष विरोधी बाकावर गेली”

‘मी स्वत:लाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री समजतो’, एकनाथ शिंदेंसमोर बंडखोर आमदाराचं मोठं वक्तव्य