नवी दिल्ली | कोणाच्या नशिबात काय असतं, हे कोणालाच ठाऊक नसतं. एखाद्या श्रीमंत व्यक्तीविषयी आपल्याला नेहमी वाटतं की, तो एका रात्रीत कसा काय श्रीमंत झाला? पण आम्ही आता तुम्हाला एका अशा व्यक्तीविषयी सांगणार आहे, जो खरंचच एका रात्रीतच श्रीमंत झाला आहे.
केरळमधील कोचीत ही एक घटना घडली आहे. अवघ्या २४ वर्षाच्या अनंतु विजयन या तरुणाला थोडी नाही तर तब्बल १२ कोटींची लॉटरी लागली आहे. यामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला असून अजूनही त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसलेला नाही.
अनंतु विजयन हे कोचीतील एका मंदिरात कारकुनाची नोकरी करतात. अनंतु विजयन यांनी सांगितले की, त्यांनी ओणम बंपर लॉटरीचे ३०० रुपयांचे तिकीट खरेदी केले होते, त्यात त्यांना १२ कोटी रुपयांची लॉटरी लागली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना यातले फक्त ७.५ कोटी रुपयेच मिळाले आहेत कारण उर्वरित रक्कम कर म्हणून कापण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनंतु विजयन यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खूपच नाजूक आहे. त्यात त्यांचे वेतन कमी असल्यामुळे ते आपल्या कुटुंबाचा सांभाळ चांगल्या प्रकारे करू शकत नव्हते.
अनंतु विजयन यांचे वडील पेंटरचे काम करतात तसेच अनंतु यांची बहीण एका फर्ममध्ये अकाउंन्टटचे काम करत होती पण सध्या कोरोना संकटामुळे तिचीही नोकरी गेलेली आहे. अनंतु विजयन म्हणाले की, सध्याच्या दिवसात वडिलांचे कामही चांगले चाललेले नाही.
केरळ सरकारने रविवारी संध्याकाळी ओणम बंपर लॉटरीचे निकाल सांगितले. त्यात आम्हाला सुखद थक्कच बसला. कारण आम्ही चक्क १२ कोटींची लॉटरी जिंकलो होतो, असं विजयन सांगितलं.
अनंतु विजयन यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना त्यांना आता १२ कोटींची लॉटरी जिंकली आहे, त्यामुळे त्यांचे जीवन आता एका रात्रीतच बदलले आहे. सध्या कोरोना संकटामुळे अनंतु विजयन यांचे कुटुंब अतिशय कठीण परिस्थितीत जगत होते.,त्यातच त्यांच्या घराची स्थितीही चांगली नव्हती. त्यामुळे या लॉटरीनं त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अनंतु विजयन यांना विचारले की, आता तुम्ही एवढ्या रुपयांचे काय करणार? तर त्यांनी उत्तर दिले, आम्ही आतापर्यंत ठरवलेले नाही, एवढ्या रुपयांचे काय करायचे. पण सद्यस्थिती पाहता आम्ही लॉटरीचे तिकीट बँकेत ठेवले आहेत, पुढे काय करायचं हे ठरलं की या पैशांचा वापर करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार? ‘या’ बड्या नेत्यानं दिली महत्वाची माहिती म्हणाले…
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या काय आहे खरं कारण
अनुरागनं स्वतःच ‘त्या’ कृत्याची कबुली दिली होती; पाहा कंगणानं अनुरागला कसं उघडं पाडलं!
शिवसेनेचा लखलखता तारा निखळला! ‘या’ बड्या नेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं नि.धन
‘अनुराग कश्यपनं मलाही घरी बोलावलं अन् मला म्हणाला…’; आणखी एका बड्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल