लता मंगेशकरांच्या निधनानंतर ठाकरे सरकारने उचललं मोठं पाऊल, आता…

मुंबई | स्वातंत्र्यपूर्व भारतापासून आपल्या सुरेख आवाजानं अवघ्या जगातील कोट्यावधी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानं एका पर्वाचा शेवट झाला आहे.

लता मंगेशकर यांच्यावर पूर्ण शासकिय इतमामात मुंबईतील शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लतादीदींच्या अंत्यविधीसाठी हजेरी लावली होती.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. ठाकरे सरकारनं राज्यभर एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. लतादीदींच्या जाण्यानं देशाच्या सांस्कृतिक अंगाचा एक भाग नाहीसा झाला आहे.

लतादीदींच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या कार्याची आठवण म्हणून ठाकरे सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. ‘लता दिनानाथ मंगेशकर’ या नावानं मुंबईत आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्याची घोषणा ठाकरे सरकारनं केली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कलीना कॅम्पससमोर तीन एकर जागेवर लतादीदींच्या नावानं काॅलेज उभारण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठातील ही जागा लवकरच विकसित करण्यात येणार असल्याच राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत.

लतादीदींच्या कुटुंबीयांची कालच भेट घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खूप ईच्छा आहे, असंही सामंत म्हणाले आहेत. परिणामी आता लतादीदींच्या चाहत्यांना या निर्णयानं आनंद झाला आहे.

माझ्या विभागानं पंडीत दिनानाथ मंगेशकर यांच्या नावानं महाविद्यालय सुरू करण्याचं अगोदरचं ठरवलं होतं. त्यानंतर आता ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे, असंही सामंत म्हणाले आहेत.

दरम्यान, लतादीदींचं निधन झाल्यानंतर लगेच राज्यात त्यांच्या स्मारकावरून जोरदार वाद पेटला आहे. अशातच आता सरकारनं हा निर्णय घेतल्यानं एकप्रकारे स्मारकाचा मुद्दा थोडा शांत झाला आहे.

महत्त्वाच्य बातम्या – 

“10 मार्चनंतर महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार…”

 “माझ्यात ठाकरे सरकारच्या ठोकशाहीला ठोकण्याची नशा”

ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे, इथे दादागिरी चालणार नाही” 

“आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही” 

‘महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी….’; संजय राऊतांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट