मोठी बातमी! मुंबईत उद्धव ठाकरेंच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल

मुंबई | शिवसेना (Shivsena) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मुंबईत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांना कोरोनाचे नियम मोडले आहेत. सकाळी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तरीही त्यांनी आज मुंबईतून वर्षा बंगल्यावरुन गर्दीत गेले, त्यामुळे त्यांनी कोरोनाचे नियम मोडले असल्याची तक्रार करण्याात आली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांची कोरोना अ‍ॅन्टिजन टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील ऑनलाईन हजेरी लावली होती. त्यानंतर मुख्यमंत्री यांनी आरटीपीसीआर टेस्ट केली.

ती टेस्ट निगेटिव्ह आल्याने संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्षा निवासस्थानी भेट घेतली.

सायंकाळी पाच नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधल्यानंतर वर्षा निवासस्थान सोडणार असल्याचे जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक मलबार हिल येथील वर्षा निवासस्थानी जमले होते.

भाजपचे दिल्लीतील युवा नेते यांनी मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये ऑनलाईन तक्रार दाखल करत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केले असल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार दिली आहे. आता यावर काय कारवाई केली जाईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“हे वादळ दोन दिवसात शांत होईल, सरकार पडणार नाही, आमदारही परत येतील” 

‘पक्ष वाचवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणं अत्यावश्यक’, एकनाथ शिंदे मागणीवर ठाम 

‘संजय राऊत खुश कारण त्याला…’, नारायण राणेंची तुफान टोलेबाजी

‘माझ्याच लोकांना मी नको असेल तर मग काय करायचं’; उद्धव ठाकरे भावूक

“गायब आमदारांनी समोर येऊन सांगा मी नालायक आहे राज्य कारभार करायला”