महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात होणार 2 दिवसांची संपूर्ण संचारबंदी

जवळपास गेल्या वर्षभरापासून कोरोना महामा.रीनं संपूर्ण जगात थै.मान घातलं आहे. चीनच्या वुहान शहरातून सुरु झालेल्या या महामा.रीनं अक्षरश: सर्वांच्या नाकी नऊ आणलं आहे. या महामा.रीमुळे सर्व उद्योगधंदे, शाळा, कॉलेज सर्व काही कित्येक महिने बंद होतं. कोरोनामुळे अनेकांवर उपासमा.रीची देखील वेळ आली होती. यातच राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची झपाट्याने होत आहे.

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असतानाच गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ पहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात 2 दिवसांची संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांनी सदर ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याच्या संदर्भात निर्देशित केले आहे. यवतमाळ जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आता वीकेंड संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता यवताळमध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी घेतला होता. आता कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी 27 फेब्रुवारी ते सोमवारी 1 मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

या संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातील सर्व दवाखाने, औषधी दुकाने, पेट्रोपपंप, गॅस वितरण इत्यादी अत्यावश्यस केवा सुरू राहणार आहे. दुध आणि दुग्धजन्य पदार्थ हे जीवनावश्यक आणि अत्यावश्यक असल्याने त्याचा पुरवठा आठवड्याचे सातही दिवस सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असतानाच गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ पहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर संपूर्ण यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचं आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

जाणून घ्या! गाजर खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

शहनाज गीलसोबतच्या लग्नाबाबत सिद्धार्थ शुक्लाचा मोठा खुलासा; म्हणाला….

कंगना राणैतनं केली श्रीदेवींसोबत स्वतःची तुलना; म्हणाली…

‘…म्हणून पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या’, ‘या’ मंत्र्याचा अजब दावा

महाराष्ट्रात पुन्हा लाॅकडाऊन होणार का?; मंत्रिमंडळातील ‘या’ बड्या मंत्र्याने केला खुलासा