ठाणे | राज्याचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेे (Eknath Shinde) यांनी शासकीय कार्यालयात म्हणजे मंत्रालयातील त्यांच्या कॅबिनमध्ये धार्मिक विधी केले. त्याप्रकरणी ठाण्यातील न्यायालयात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे.
ठाणे येथील रहिवासी धनाजी सुरोसे (Dhanaji Surose) यांनी त्यांच्या विरोधात ठाणे न्यायालयात ही तक्रार दाखल केली आहे. धनाजी सुरोसे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.
तक्रारदार धनाजी सुरोसे यांच्या तक्रारीनुसार, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर 7 जुलै रोजी मंत्रालयातील कार्यालयात सत्यनारायण कथा, पूजन केले होते. त्यांचे हे कृत्य राज्यघटनेच्या विरुद्ध आहे.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात शासकीय कार्यालयात कोणत्याही प्रकारची धार्मिक पूजा केली जाऊ शकत नाही. त्यांची ही पूजा घटनाबाह्य आहे, असा दावा धनाजी सुरोसे यांनी केला आहे.
दरम्यान. शासकीय नियम आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचेही यात उल्लंघन आहे, असे सुरोसे यांनी तक्रारीत म्हटले आहे. धनाजी सुरोसे यांनी यामुळे ठाणे न्यायालयात धाव घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या –
“बाळासाहेबांच्या पोटी आलात म्हणजे काही राजा झालात का?”
‘उद्धव ठाकरे दोन वेळा घरातून पळून गेले होते’, नारायण राणेंचा गौप्यस्फोट
“काय ते प्रश्न.. काय ती उत्तरं.. काय तो घरगुती कार्यक्रम.. एकदम ओक्के”
“उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व भाजपमुळेच आहे”
“तुमच्यात कर्तृत्व नाहीये, तुम्ही मर्द नाहीत, शिवसेनेच्या बापाचा फोटो लावून भीक मागू नका”