कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास सीटी स्कॅनची गरज नाही, अन्यथा ‘हा’ गंभीर आजार होऊ शकतो

नवी दिल्ली |   काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. पंरतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

सध्या सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. कोरोनाचा ही लाट आधिच्या लाटेपेक्षा खूप भयानक असल्याचं दिसून येतं आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काही लक्षणं जाणवल्यास आपण लगेचच जवळच्या रूग्णालयात जाऊत कोविड टेस्ट करून घेतली पाहिजे. परंतू तुम्हाला कोरोनाची सौम्य लक्षणं असतील तर सीटी स्कॅन करु नका असं आवाहन अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानकडून करण्यात आलं आहे.

सीटी स्कॅन केल्यानंतर आपल्या फुफ्फुसात किती इन्फेक्शन झाले आहे याची माहिती मिळवते. त्याद्वारे HRCT स्कोअर पाहिला जातो. मग त्यानुसार कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केला जातो. तसेच त्यानूसार त्या रूग्णाला  गोळ्या-औषधं दिली जातात. मात्र, तुम्हाला कोरोनाची सौम्य लक्षणं असतील तर सीटी स्कॅन करण्याची गरज नसल्याचं एआयआयएमएसकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे.

सीटी स्कॅन हे छातीच्या तीनशे एक्स-रेच्या समतुल्य आहे, हे अत्यंत हानिकारक असल्याचं एआयआयएमएस चे संचालक रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे.

तसेच कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास तुम्ही सीटी स्कॅन केलं. तर तुम्हाला कॅन्सर होण्याचीही शक्यता रणदीप गुलेरिया यांनी वर्तवली आहे.

दरम्यान, दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सरकारने काही निर्बंधरही लागू केले आहेत. त्यामुळे या गंभीर परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना हे नियम काटेकोरपणे पाळण्याची आवश्यकता आहे.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! मेट्रो जात असताना अचानक पूल कोसळला अन्…,…

पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी ती चक्क सिंहाशी भिडली…

पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी ती चक्क सिंहाशी भिडली…

पुणे हदरलं! तडीपार गुंडाने केला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा…

लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी शिकवली अद्दल,…