मुंबई | जगभरात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनानं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. या भल्यामोठ्या संकटासोबत जगभरातील आरोग्य यंत्रणा लढत आहेत. अशात आता कोरोनाच्या ओमिक्राॅन या नव्या व्हेरियंटने सर्वांची चिंता वाढवली आहे.
राज्यभरात सध्या सरकारनं लसीकरण मोहीमेचा वेग वाढवण्याच्या सुचना दिल्या आहेत. परिणामी आता सरकार आणखीन निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सध्या मिळत आहे.
देशातील एकूण ओमिक्राॅनच्या रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ओमिक्राॅन रूग्ण आढळले आहेत. अशात आता कोरोनाच्या रूग्णसंख्येत देखील झपाट्यानं वाढ होत असल्यानं प्रशासनापुढील अडचणी वाढल्या आहेत.
राज्य सरकारनं नुकतंच राज्यात गर्दी वाढू नये म्हणून विविध निर्बंध लावण्यात येत असल्याची घोषणा केली होती. अशातच नवीन वर्षाच्या सुरूवातीला राज्यात पार्टी करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
राज्य कोरोना टास्क फोर्सची आज बैठक पार पडली. त्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत कोरोनाच्या वाढत्या प्रभावावर भाष्य केलं आहे. परिणामी राज्यात लाॅकडाऊनची चर्चा रंगली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच निर्बंध लावण्याबाबत निर्णय घेतली असंही राजेश टोपे म्हणाले आहेत. परिणामी राज्यात कठोर निर्बंध लागण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.
राज्यात गर्दीवर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. मास्क वापरणे बंधनकारक आहे, सुरक्षित अंतर राखलं पाहिजे, असं राजेश टोपे म्हणाले आहेत. परिणामी राजेश टोपे यांच्या बोलण्यातून कोरोनाची दाहकत स्पष्ट होत होती.
दरम्यान, सध्या राज्यात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. पण कोरोनाच्या आकड्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परिणामी राज्य सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –
भाजप खासदार म्हणतात,”नाईट कर्फ्यू आणि लाॅकडाऊन हा बोगसपणा, लग्न समारंभात…”
नाशकात ‘दंगल’… बारकाल्या पोरींची कॉलेजमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडीओ-
मोठी बातमी! नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता
‘…तर महाराष्ट्रात लॉकडाऊन लावावा लागेल’; गृहमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
नितेश राणे यांना धक्क्यावर धक्के! सहकार विभागाकडून मोठी कारवाई