कोल्हापुरात भर रस्त्यात राडा! नगराध्यक्षांनीच ग्रामस्थाच्या कानाखाली लगावल्याने गदारोळ; व्हिडीओ व्हायरल

कोल्हापूर | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. सर्वत्र निवडणुकांचं वातावरण असल्यानं आरोप प्रत्यारोपाची खेळी चालूच आहे. अशातच आता कोल्हापूरच्या हातकणंगलेमध्ये अतिशय खळबळजनक प्रकार घडला आहे.

कोल्हापुरातील हातकणंगले नगरपंचायतीच्या परिसरात नगराध्यक्ष आणि एका नागरिकामध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. नगरपंचायतीच्या दारात वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यानं हा वाद पे.टल्याचं बोललं जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकंच खळबळ उडाली आहे.

हातकणंगले नगरपंचायतीच्या दरातील रस्ता अगदी अरुंद आहे. याच रस्त्यावर बाजारपेठ देखील आहे. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानांची गर्दी आहे. येथील एका दुकानात माल उतरवण्यासाठी रविवारी एक टेम्पो आला होता. हा टेम्पो रस्त्यातंच थांबला होता.

यावेळी नगराध्यक्ष अरुण जानवेकर यांची देखील गाडी तिथे आली. जानवेकर यांनी टेम्पो चालकाला झापण्यास सुरुवात केली. यानंतर संतापलेला ग्रामस्थ आणि नगराध्यक्ष यांच्यात शाब्दीक बाचाबाची सुरू झाली. दोघांनी एकमेकांना शि,वीगाळ देखील केली.

हाच वाद हाणामारीपर्यंत आला. नगराध्यक्षांनी त्या ग्रामस्थाच्या कानाखाली वाजवली. यानंतर ग्रामस्थाने देखील जानवेकर यांची कॉलर पकडून त्यांना मागे ढकलले. तिथे उपस्थित असणाऱ्या इतर ग्रामस्थांनी या वादात हस्तक्षेप करत दोघांच्यातील वाद मिटवला.

या वादानंतर दोघांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली. दोघांनी पोलिसांना आपल्याला तक्रार दाखल करायची असल्याचं सांगितलं. मात्र, पोलिसांनी यावेळी दोघांच्यातील हा वाद मिटवला आणि तक्रार दाखल केली नाही.

या दोघांतील वाद भर चौकात चालू होता. यामुळे घटनेचा व्हिडीओ काही लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये कै.द केला होता. या घटनेनंतर काही लोकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

खुद्द नगराध्यक्षच भर चौकात मारहाण करत असल्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. लोक हा व्हिडीओ पाहिल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. आता या प्रकरणानंतर हातकंगणले मधील वाहतुकीचा प्रश्न सुटणार क? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या – 

काय बोलावं आता! टीव्हीवर लाईव्ह असतानाच कुत्र्यानं तिच्या हातातला माईक खेचला अन्…; पाहा व्हिडीओ

राशीभविष्य : ‘या’ राशीच्या लोकांसाठी आहे आज भाग्याचा दिवस, नक्की वाचा

वाहह! अवघ्या 9 रुपयांत मिळेल घरगुती गॅस सिलिंडर, जाणून घ्या काय आहे भन्नाट ऑफर?

काय सांगता! मुख्यमंत्र्यांच्याच हेलिकॉप्टरला मारावा लागला धक्का; व्हिडीओ व्हायरल

‘पापा की परी रोड पर पडी’; भर रस्त्यात तरुणी स्कुटीवरुन दणकन आदळली, पाहा व्हिडीओ