Top news देश

एका माशानं तिला केलं लखपती; मिळालेली रक्कम ऐकून हैराण व्हाल!

कोलकाता | पश्चिम बंगालमध्ये नवल वाटावी अशी एक घटना घडली आहे. समुद्रात सापडलेल्या फक्त एका माश्यामुळे एक महिला लखपती बनली आहे. एका सामान्य कुटुंबातील मच्छिमा.र करणाऱ्या महिलेल्या एका माशाने मालामाल बनवल्यानं सध्या परिसरात फक्त याच महिलेची चर्चा चालू आहे.

पुष्पा कर नावाची महिला पश्चिम बंगालमध्ये दक्षिण परगणा जिल्ह्यातील सुंदरबन मधील सागरद्वीप भागात राहते. रोज सकाळी समुद्रकिनारी जाणे, मासे पकडणे आणि आलेल्या पैश्यातून स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे, ही या महिलेची दिनचर्या आहे. मात्र पुष्पा कर यांना समुद्रात असा मासा सापडला आहे ज्याचे त्यांना तब्बल 3 लाख रुपये मिळाल्यानं त्या मालामाल झाल्या आहेत.

पुष्पा कर नेहमीप्रमाणे नदी किनारी मासे पकडण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी नदीतील एका मृ.त माश्यावर त्यांची नजर पडली.  जहाजेच्या धडकेनं या माशाचा मृ.त्यू झाला असावा, असा पुष्पा कर यांना वाटलं.  त्या माश्यावर नजर पडताच त्याला बाहेर काढण्यासाठी पुष्पा यांनी नदीत उडी घेतली. हा मासा तब्बल  52 किलोचा होता यामुळे या माश्याला बाहेर काढण्यासाठी त्यांना प्रचंड कष्ट घ्यावे लागले.

पुष्पा यांनी एकटीने तो मासा प्रचंड मेहनतीनं नदीतून बाहेर काढला. या भल्या मोठ्या माशाला नदीतून बाहेर काढल्यानंतर या माशाची आपल्याला चांगली किंमत मिळेल म्हणून त्या खूप खुश होत्या. पुष्पा यांनी या माश्याला किनाऱ्यावर आणल्यावर लोकांनी सांगितलं की हा भोळा मासा आहे याची खूप चांगली किंमत मिळेल.

या माशाचा खाण्यासाठी उपयोग होत नसून औषधे आणि इतर गोष्टींसाठी या माशाचा उपयोग करण्यात येतो, असंही काही लोकांनी पुष्पा यांनी सांगितले. यानंतर पुष्पा यांनी त्वरित तो मासा विक्रीसाठी हलवला. मात्र, मासा विक्रीसाठी नेत असताना या माश्याच्या सडण्याची प्रक्रिया सुरु झाली होती.

मासा विक्रीसाठी नेल्यानंतर 52 किलोच्या या माशाचे 6200 रुपये प्रती किलो या हिशोबानं तब्बल 3 लाख रुपये पुष्पा यांना मिळाले. अपेक्षेपेक्षा जास्त कमाई झाल्यानं आपण प्रचंड आनंदी असल्याचं पुष्पा कर यांनी म्हटलं आहे. तसेच या माश्यामुळे माझ्या आर्थिक अडचणी संपणार आहेत. हा मासा सापडणे माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण आहे, असंही पुष्पा कर यांनी म्हटलं आहे,

दरम्यान, दक्षिण पूर्व आशियात या माशाच्या काही अवयवांची निर्यात करण्यात येते. या प्रजातीच्या सुक्या माश्याची किंमत तब्बल 80 हजार रुपये प्रती किलो इतकी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोनाबाबत अत्यंत मोठी घडामोड; अशा प्रकारे कोरोनाचा आता हवेतच खात्मा होणार!

“हे न.शेत जगणारे नर्कातील किडे आहेत, यांना कोण आपला आदर्श समजणारय?”

ड्र.ग्ज प्रकरणी धक्कादायक बातमी! एनसीबी अधिकाऱ्यानं केला ‘या’ चार बड्या अभिनेत्यांच्या नावांचा खुलासा

‘ड्र.ग्जचाच प्रकार असणारं सीबीडी ऑईल भारतात कायदेशीर करा!’; वाचा कोणी केली ही मागणी

‘त्या’ प्रकरणी कंगना चुकिचीच, कंगनाला खडे बोल सुनावताना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणाले…