काळजाला हेलावून टाकणारी घटना! कोरोनामुळे एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याचं समजताच आईनेही सोडले प्राण

बार्शी| कोरोनाच्या दुस-या लाटेने महारौद्ररूप धारण केले आहे. अशा स्थितीत देशातील आरोग्यव्यवस्थाही कमी पडत आहे. ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा मोठा तुटवडा भारतात निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासनावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. अशातच कळंब तालुक्यातील अंदोरा या ठिकाणी काळजाला हेलावून टाकणारी घटना घडली आहे.

कळंब तालुक्यातील अंदोरा या ठिकाणावरील एका तरुण मुलाचा कोरोनामुळं मृत्यू झाल्यानं आईनं अन्नत्याग केला होता. एकुलत्या एक मुलाचा अशा प्रकारे अंत झाल्यानं विरह सहन करून न शकणाऱ्या मातेचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

तरुण मुलाला कोरोना झाल्यानं त्याला बार्शी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या अन्य लोकांची कोरोना चाचणी केली असता, आई आणि पत्नीचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

बार्शी याठिकाणी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या तरुणाचं अचानक निधन झालं. एकुलत्या एक मुलाचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याची माहिती मिळताच, उपचाराधिन असणाऱ्या आईनं अन्नत्याग केला

अन्नत्याग केल्यामुळे संबंधित मातेची प्रकृती आणखी खालावली आणि त्यांचाही कोरोनामुळं मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील मायलेकराचा मृत्यू झाल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, संपुर्ण देश सध्या कोरोनाच्या भयंकर परिस्थितीशी लढत आहे. त्यातच काही राज्यांमध्ये तर कोरोनाने हाहाकार केला आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही नंबर लागतो. महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही.

मागील वर्षापासून आपण कोरोनासोबत जगत आहोत, त्याला संपवण्यासाठी लढत आहोत. कोरोनाच्या दुस-या लाटेने तर मृत्युचे तांडवच चालवले आहे.

महत्वाच्या बातम्या – 

कौतुकास्पद! आई-पत्निचे दागिने गहाण ठेवत पुण्यात उभारलं…

आश्चर्यकारक! 25 वर्षीय ‘या’ महिलेने दिला चक्क नऊ…

पदर सावरत आजी म्हणाली ‘सोचेंगे तुम्हे प्यार कर के…

निष्काळजीपणा भोवला! कोरोना काळात मतदान करण्यासाठी…

कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास सीटी स्कॅनची गरज नाही, अन्यथा…