गॅस सिलेंडरचा भ.डका! घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ

नवी दिल्ली | आज घरोघरी स्वयंपाक बनवण्यासाठी एलपीजी सिलेंडरचा वापर केला जातो. मात्र, अलिकडे गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे सिलेंडर खरेदी करणे सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचं होत चाललं आहे. सिलेंडरच्या वाढत्या दरामुळे गृहिणींचं बजेट देखील कोलमडत आहे.

केंद्र सरकार घरगुती गॅस सिलेंडरसाठी अनुदान देत असतं. हे अनुदान घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीच्या 30 ते 40 टक्के ठेवले जाते. मात्र, अलिकडे केंद्र सरकार हे अनुदान कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे अनुदान 270 रूपयांवरुन थेट 40 रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 75 ते 90 रूपयांची वाढ होणार आहे.  या वर्षातील गॅस सिलेंडरच्या दरातील ही दुसरी वाढ आहे. 1 फेब्रवारी रोजी गॅस सिलेंडरच्या दरात 50 रूपयांची वाढ झाली होती. यामुळे सध्या तरी  1 फेब्रवारीच्या गॅस दर वाढीनुसार एलपीजी ग्राहकांना अनुदानीत सिलेंडरसाठी जवळपास 769 रूपये मोजावे लागत आहेत

दरम्यान, दिवसेंदिवस एलपीजी गॅसच्या चोरीचं प्रमाण वाढतंच चाललं आहे. यालाच आळा घालण्यासाठी तेल कंपन्यांनी काही नवीन नियम लागू केले आहेत. याद्वारे ग्राहकांची ओळख पटवून सिलेंडर दिला जाणार आहे.

एलपीजी कंपनीनं आता Delivery Authentication Code ही नवीन पद्धत सुरु केली आहे. ज्या अंतर्गत ग्राहकांना सिलेंडर घ्यायचा असल्यास मोबाईलवर ओटीपी मिळेल त्याची सत्यता पडताळल्याशिवाय ग्राहकांना सिलेंडर मिळणार नाही.

यापूर्वी घरगुती गॅसचं फक्त बुकिंग केल्यास गॅस मिळत होता. मात्र, आता फक्त गॅसच्या बुकिंगवरच ही प्रक्रिया थांबणार नाही. त्यापुढेही गॅस सिलेंडर घेण्यासाठी आणखी प्रक्रिया करावी लागणार आहे. गॅस सिलेंडरचं बुकिंग झाल्यानंतर ग्राहकांना त्यांच्या रजिस्टर नंबरवर ओटीपी पाठवण्यात येईल.

हा ओटीपी ग्राहकांना सिलेंडर डिलिव्हरी करण्यासाठी जो व्यक्ती येईल त्याच्यासोबत शेअर करावा लागेल. ओटीपी मॅच झाल्यानंतरच ग्राहकांला सिलेंडर दिला जाईल. प्रथम DAC चा वापर देशातील 100 स्मार्ट शहरांमध्ये करण्यात येईल. सध्या दोन शहरांमध्ये हा पायलट प्रोजेक्ट चालू आहे.

महत्वाच्या बातम्या –

खडसेंविरोधात ईडीची का.रवाई! पुन्हा समन्सची नोटीस बजावून अ.टक करणार?

चालू मिटींगमध्ये बायको झाली आऊट ऑफ कंट्रोल नवऱ्याला केलं किस अन् मग…; पहा व्हिडीओ

जल्लोष नडला ! गजानन मारणेला जेल मधून सुटल्यानंतरही दिले चौकशीचे आदेश

‘सुशांतचा वापर केवळ प्रसिद्धिसाठी केला’ ‘या’ फोटोंमुळे अंकिता सोशल मीडियावर होतेय ट्रोल

काय झालं साराला? हॉस्पिटलमधून व्हिडीओ शेअर करत केला खुलासा, म्हणाली…