मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांच्या गटात शिवसेनेचे अनेक मंत्री आणि आमदार गेले. त्यांनी त्यांच्या जोरावर भाजपच्या मदतीने सत्ता देखील स्थापन केली.
शिंदे यांच्या पक्षात येणाऱ्यांची संख्या मात्र कमी होत नाही आहे. आता काँग्रेसचे मोठे नेते आणि माजी मंत्री अस्लम शेख (Aslam Shaik) आणि एकनाथ शिंदे यांच्यात भेट झाली आहे.
काही दिवसांपू्र्वी अस्लम शेख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadanvis) भेट घेतली होती. त्यामुळे ते पक्षांतर करणार का? अशा चर्चांणा उधाण आले आहे. त्यांनी विधान भवनातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली.
त्यांच्या या भेटीमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांनी देखील माध्यमांजवळ कोणताही खुलासा केला नाही. काँग्रेस नेत्याने विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्याची भेट घेतल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वी अस्लम शेख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन त्यांची देखील भेट घेतली होती. त्यांना शिंदे गटात किंवा भाजपात यायचे आहे का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
या भेटीसाठी भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) आणि काँग्रेस नेते अस्लम शेख एकाच गाडीतून फडणवीसांच्या सागर या बंगल्यावर गेले होते. भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी अस्लम शेख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
सोमय्यांनी शेख यांच्यावर 200 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांनी ईडीची नोटीस येण्याची दाट शक्यता आहे. त्याचमुळे तर ते भाजपसोबत जाण्याच्या तयारीत नाहीत ना, असे प्रश्न आता विचारले जात आहेत.
महत्वाच्या बातम्या –
“महिलेचे कपडे उत्तेजक असतील आणि लैगिक छळ झाला, तर…” – न्यायालय
दरवाजे अद्यापही खुले आहेत, पण… आदित्य ठाकरेंची बंडखोरांना अट
रेवडी प्रकरण: आश्वासने देणे धोरणावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय