नवी दिल्ली | सोनं म्हटलं की भारतीयांची पहिली पसंती. भारतीय सोनं खरेदी करायला नेहमीच उत्सुक असलेले पहायला मिळतात. भारतामध्ये सोन्या चांदीच्या दागिण्यांना मोठी मागणी आहे. एक उत्तम गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं.
सोन्याच्या मोठ्या मागणीमुळे देशांतर्गत सोन्याचा भाव नेेहमीच गरम असतो. गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे.
ऐन दिवाळीत तर सोन्याच्या भावात चढ-उतार पहायला मिळतात. अशातच सध्या सोन्याच्या किमतीत घसरण झालेली पहायला मिळत आहे. ऑक्टोबरमधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.04 टक्क्यांनी घसरून 48,000 रुपये प्रतितोळा इतका झाला.
दुसरीकडे आजच्या व्यवहारात चांदी 0.16 टक्क्यांनी घसरली. आज 1 किलो चांदीचा भाव 64,774 रुपये इतका आहे. त्यामुळे सध्या नागरिकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.
सणासुदीच्या मुहुर्तावर गुंतवणुकदारांसाठी सध्या सोनं खरेदी करण्याची चांगली संधी आहे. अशातच आता आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात मोठी घसरण अनुभवायला मिळाली आहे.
सोन्याच्या भावावर आंतराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांशवेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातो.
सोन्याच्या दरात स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.
सोनं खरेदी करण्यासाठी ते किती शुद्ध आहे हे तपासनं तेवढंच गरजेचं आहे. 24 कॅरेट सोनं सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोनं असते.
महत्त्वाच्या बातम्या –
कर्णधारपद सोडल्यावर विराटची भावूक प्रतिक्रिया, म्हणाला…
अभिनेत्री पूनम पांडेच्या पतीला पुन्हा मुंबई पोलिसांकडून अटक
कचोरीसोबत कांदा न दिल्यामुळे तरुणीचा राडा, पाहा व्हिडीओ
“2 वर्ष प्रयत्न करुनही ठाकरे सरकार मजबूत, आमचं काय उखडणार?”
“माझा विषय आला की सगळे ढवळाढवळ करतात, आता मी ढवळाढवळ करू का?”