“… तर नोटांवर देखील मोदींचे फोटो छापले असते” अहमदाबादमधील कॉलेजला मोदींच्या नावावरुन वाद

अहमदाबाद | येथील एल. जी. महाविद्यालयाचे (L. G. Medical College) नामंतर करण्यात येणार असल्याचे वृत्त अलीकडे आले होते. त्यावर आता वादंग निर्माण झाला आहे. कारण या महाविद्यालयाचे नामांतर पंतप्रधानांच्या नावात करण्यात येणार आहे.

एल. जी. महाविद्यालयाचे नाव बदलून ते ‘नरेंद्र मोदी मेडिकल कॉलेज’ (Narendra Modi Medical College) करण्यात येणार आहे. अहमदाबाद महानगरपालिकेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यावरुन विरोधक आक्रमक झाले आहे.

नरेंद्र मोदींचे संस्थांना आणि मैदानांना नाव देण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbahi Patel Stadium) यांच्या नावे असलेल्या क्रिकेट स्टेडिअमचे नाव नरेंद्र मोदी स्टेडिअम करण्यात येणार होते.

त्यावेळ देखील मोठ्या प्रमाणात मोदी यांच्यावर टीका करण्यात आली होती आणि त्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता. आता पुन्हा एकदा या नामांतराच्या चर्चेने टीकांचा पाऊस सुरु झाला आहे.

या मुद्द्यावरुन तेलंगणा राष्ट्र समितीचे (Telangana Rashtra Samiti) अध्यक्ष आणि उद्योगमंत्री केटी रामा राव (K. T. Rama Rao) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्यावर टीका केली आहे.

राव म्हणाले, पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारामण (Nirmala Sitaraman) यांना शक्य झाले, तर ते भारतीय रिझर्व बँकेला नोटीस देऊन नोटांवरही महात्मा गांधीच्या फोटोच्या जागी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे फोटो लावण्याचे आदेश देतील.

अहमदाबाद येथे 2009 साली एलजी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. या मेडीकल कॉलेजच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत महाविद्यालयाचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.

गुरुवारी हा प्रस्ताव सादर करण्यात आला. आणि यावेळी सर्वानुमते मंजूर देखील झाला. एलजी महाविद्यालय मनीनगर (Maninagar) भागात येते. पंतप्रधान ज्यावेळी मुख्मंत्री होते त्यावेळी ते तीन वेळी या भागातून आमदारकीला निवडून आले होते.

महत्वाच्या बातम्या –

“मी श्रीमती केजरीवाल यांना हात जोडून सांगतो की…”; भाजप खासदारांची केजरीवालांच्या पत्नीला विनंती

‘हे रात्री बावचळून उठतात आणि….’, अजित पवारांची तुफान टोलेबाजी

मुंबईसह ‘या’ भागांत मोठा पाऊस; पुढील तीन ते चार तास तुफान पावासाची शक्यता

रामदास आठवलेंची राहूल गांधींच्या “भारत जोडो” यात्रेवर कवितेतून टीका

“मुख्यमंत्री मोदींचे अपयश पंतप्रधान मोदींना निस्तरावे लागत आहे”, काँग्रेसचा खोचक टोला