मुंबई | आपल्या अभिनयानं बाॅलिवूडमध्ये वेगळी अशी ओळख निर्माण करणारा अभिनेता अपारशक्ती खुराणा. अपारशक्ती खुराना बाबा झाला आहे. त्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी सांगितली आहे.
अपारशक्ती खुरानाला कन्यारत्न झालं असून त्यानं तिचं नावही जाहीर केलं आहे. त्यानं मुलीचं नाव आरजोयी खुराना ठेवलं असल्याची माहिती दिली आहे. या गोड बातमीसाठी चाहत्यांनी त्याला मोठ्या प्रमाणावर शुभेच्छाही दिल्या आहेत. याशिवाय आकृती आणि बाळ दोघेही सुखरुप असल्याचं सांगितलं.
अपारशक्तीच्या मुलीच्या जन्मामुळं अभिनेता आयुष्मान खुराना हा काका झाला आहे. या आनंदाच्या क्षणी अपारशक्तीची आई-वडील, भाऊ देखील उपस्थित होते. कलाकारांनीही सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
याआधी अपारशक्तीने त्याच्या पत्नीच्या प्रेग्नन्सी दरम्यानचे देखील फोटो शेअर केले होते. त्या फोटोंना देखील त्याच्या चाहत्यांनी विशेष पसंती दाखवली होती. आयुष्मान खुरानानंही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं होतं की ‘कुटुंबात आणखी एक सदस्य, बेस्ट फीलिंग!’.
अपारशक्ती खुराणाला दंगलमधून पहिल्यांदा ब्रेक मिळाला होता. त्यात त्यानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अनेकदा त्याच्या अभिनयाचं कौतूकही झालं. तो सहकलाकाराच्या भूमिकेत प्रेक्षकांचं नेहमीच मनोरंजन करताना पाहायला मुळतो.
लवकरच तो ‘हेल्मेट’ या सिनेमात दिसणार आहे. सोलो लीड म्हणून त्याचा हा पहिला सिनेमा आहे. या थ्रिलर कॉमेडी चित्रपटात अपारशक्ती खुराना, प्रनूतन बहल आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.
महत्वाच्या बातम्या –
…म्हणून सई ताम्हणकर मराठी चित्रपटांपासून दुरावली!
पवनदीपच्या खासगी गोष्टीचा अरुणीताकडून खुलासा, म्हणाली…
मी आता केक कापणार नाही तर…; बर्थडेवरून भडकलेल्या गर्लफ्रेंडने उचललं ‘हे’ पाऊल; व्हिडीओ व्हायरल
सेटवर राखीला चावला कुत्रा, राखी म्हणतेय मी देखील त्याला चावणार; पाहा व्हिडीओ
रिंकू राजगुरुचा आपल्या रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा, म्हणाली…