Top news महाराष्ट्र मुंबई

ओमिक्रॉनचं नवं लक्षण आलं समोर, अजिबात अंगावर काढू नका!

corona e1620367445647
photo credit - pixabay image

मुंबई | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने देशात खळबळ माजली आहे. दक्षिण अफ्रिकेसह 12 देशांमध्ये कोरोनाचा हा नवा व्हेरियंट आढळून आला आहे. दक्षिण आफ्रिके (South Africa) वरुन कर्नाटकात आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते.

कोरोनाच्या नव्या Omicron व्हेरिएंटची लक्षणं समोर आली आहेत. दक्षिण आफ्रिकेतील एका डॉक्टरने नवीन कोविड प्रकार ओमिक्रॉनची लक्षणे काय आहेत हे उघड केलं आहे.

चव आणि सुगंध कमी होणे, ताप, घसा खवखवणे आणि शरीर दुखणे ही कोरोनाची सर्वात सामान्य लक्षणे आहेत. मात्र तथापि, ओमिक्रॉनच्या प्रत्येक रुग्णामध्ये ही लक्षणे आढळत नाहीत.

आतापर्यंतच्या डेटाच्या आधारे, शास्त्रज्ञ म्हणतात की फक्त 50% रुग्णांमध्ये ताप, कफ आणि चव कमी होणे जाणवतं. तथापि, बहुतेक ओमिक्रॉन रुग्णांमध्ये एक विशिष्ट लक्षण असते आणि ते म्हणजे भूक न लागणं हे आहे.

तुम्हाला इतर काही लक्षणांसह भूक लागत नसेल, तर तुम्ही डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्यावा आणि नंतर कोविड चाचणी करून घ्यायला हवी.

दरम्यान, अमेरिका, युरोपमधील काही देश, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांग्लादेश, चीन, बोत्सवाना, मॉरिशस, न्यूझिलंड, झिंबाब्वे, हाँगकाँग, सिंगापूर आणि इस्राईलमध्ये हा कोरोनाचा नवा विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे या देशातून भारतामध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्य मंत्रालयाच्या वतीने नवी नियमावली तयार करण्यात आली आहे.

नव्या नियमावलीनुसार संबंधित देशातून भारतामध्ये आलेल्या प्रवाशाला त्यांने मागील 14 दिवसांत कुठेकुठे प्रवास केला, त्याचा तपशील सादर करावा लागणार आहे. सोबतच त्याला कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल हवाई सुविधा पोर्टलवर सबमीट करणं बंधनकारक आहे. तरच संबंधित प्रवाशाला देशात प्रवेश मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

आर्यन खान प्रकरणातील कॉर्डेलिया क्रुझवर अडकले 2000 प्रवासी; ‘हे’ धक्कादायक कारण आलं समोर 

“सिंधुदुर्गात रंगतदार काहीच नसतं, जे घडतं ते रक्तरंजित असतं”

CDS जनरल बीपीन रावत यांच्या अपघाताबद्दल ‘ही’ महत्वाची माहिती आली समोर

कोरोनाची ‘ही’ दोन नवीन लक्षणं आली समोर; दिसताच लगेच टेस्ट करुन घ्या!

मेहबूबाला पाठीवर घेऊन चालला होता तरूण अन् पुढे भलतंच घडलं, पाहा व्हिडीओ