मुंबई | कोरोनाचं आणखी एक नवं लक्षण समोर आलं आहे. आता WHO नं हे लक्षण गंभीर असल्याचं वर्णन करणारा इशारा जारी केला आहे. जाणून घेऊ या कोरोनाच्या या गंभीर लक्षणाबद्दल.
जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) याबाबत इशारा दिला आहे. थंडी वाजून येणं, सततचा खोकला, वास किंवा चव कमी होणे ही कोरोनाची मुख्य लक्षणे आहेत.
यानंतर श्वास घेण्यास त्रास होणं, आजारी वाटणे, थकवा, वेदना, घसा खवखवणे, डोकेदुखी, नाक वाहणे, भूक न लागणे आणि अतिसार ही लक्षणं त्यात सूचीबद्ध केली आहेत.
WHO च्या यादीनुसार, भ्रम हे ‘गंभीर लक्षण’ म्हणून सूचीबद्ध केलं गेलं आहे आणि कोणालाही याचा त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरांची मदत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्मरणशक्ती किंवा एकाग्रतेमध्ये समस्या येतात तेव्हा त्याला दीर्घ कोविडचं लक्षण म्हणून ओळखलं जातं.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारनं कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मार्च 2020 मध्ये घालण्यात आलेले निर्बंध हळू हळू शिथील कऱण्यात येत होते. मात्र आता दोन वर्षांनंतर निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
राज ठाकरेंच्या वक्तव्यावर दीपाली सय्यद संतापल्या, म्हणाल्या…
भारताच्या ‘त्या’ निर्णयावर अमेरिकेचा संताप; दिला ‘हा’ गंभीर इशारा
पुढील 4 दिवस महत्त्वाचे! कडाक्याच्या उन्हाळ्यात अवकाळी पावसाचा इशारा
गडकरी म्हणाले, “रोहित तू बिंधास्त जा, तुझं काम झालंच म्हणून समज”
ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…