देश

“भाजपने नाही तर बंडखोरांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला”

बंगळुरु : कर्नाटकमधील काँग्रेस आणि जेडीएसच्या 16 बंडखोर आमदारांनी राजीनामा दिला. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबईत काँग्रेसचे डी. शिवकुमार त्यांची मनधरणी करण्यासाठी आले होते.

डी. शिवकुमार यांना मुंबईत आमदारांना भेटण्यापासून पोलिसांनी अडवलं होतं. आमदारांनी त्यांच्यापासून धोका असल्याचं सांगत पोलिसांकडे संरक्षण मागितलं होतं. पोलिसांनी त्यांना ताब्यातही घेतलं होतं. 

माझ्या पाठीत भाजपने नाही तर बंडखोरांनी खंजीर खुपसला आहे, अशी खंत डी. शिवकुमार यांनी व्यक्त केली. ते मंगळवारी कर्नाटकच्या विधानसभेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांवर टीकाही केली.   

माझा घात भाजपने नाही तर मुंबईत असलेल्या आमदारांनी केला. एक दिवस ते तुमचाही घात करतील. कोणत्याही परिस्थितीत त्यांना मंत्रीपद मिळणार नाही. याची शाश्वती मी देतो, असंही शिवकुमार म्हणाले. 

बंडखोर आमदारांनी भाजपच्या नेत्यांची दिशाभूल केली. मी मुंबईत त्या आमदारांशी बोलायला गेलो होतो. त्यातील एका आमदाराशी बोलणं झालं होतं. मला इकडून घेऊन जा असंही तो आमदार म्हणला होता, असं शिवकुमार यांनी सांगितलं.

काँग्रेसचे बंडखोर आमदार एमटीबी नागराज यांना माझ्यामुळेच तिकीट मिळालं होतं. आम्ही त्यांच्याशी चर्चाही केली. आम्ही त्यांना डाबून ठेवू शकत होतो. मात्र आम्ही तसं केलं नाही, असंही शिवकुमार म्हणाले आहेत.

नागराज यांना विधानसभेत आणून सरकराविरोधात मतदान करु द्या, असं शिवकुमार यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-पंतप्रधान नरेंद्र मोदींना संसदेत भेटायला आला ‘हा’ खास मित्र

-त्या २ जागा द्या, नाहीतर नागपुरात मुख्यमंत्र्यांसह सर्व जागा पाडू; शिवसेनेचा इशारा

-“मोठं होण्यासाठी चंद्रकांत पाटलांकडून शरद पवारांवर टीका सुरु”

“मोदीजी तुमचं आणि ट्रम्पचं काय बोलणं झालं हे तुम्ही देशाला सांगावं”

-मला तुमच्याकडून या प्रश्नाची अपेक्षा नव्हती- नुसरत जहाँ

IMPIMP