नवी दिल्ली | भारताला ब्रिटिशांपासून स्वतंत्र होऊन येत्या 15 ऑगस्ट 2022 रोजी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे हे वर्ष आपण देशाच्या स्वतंत्र्याचे अमृतमहोत्सवी (75th Anniversary of Independence) वर्ष म्हणून साजरे करीत आहोत.
देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दूरदर्शनच्या “स्वराज: भारत के स्वातंत्र्य संग्राम की समग्र गाथा” चे उद्घाटन देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या हस्ते करण्यात आले.
दूरदर्शनने भारताचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांच्या नेतृत्वाखाली या मालिकेचे 75 भाग (Episode) बनविण्याचे काम केले आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या शूर भूमिपुत्रांना ही मालिका समर्पित करण्यात आली आहे.
संपूर्ण देशात येत्या 14 ऑगस्ट रोजी दूरदर्शनवर हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये ही मालिका प्रसारीत करण्यात येणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी अमित शहा यांच्याविषयी गौरोद्गार काढले.
अमित शहा हे आधुनिक भारतातील कुशल रणनितीकार आणि चाणक्य आहेत, असे ठाकूर म्हणाले. तसेच मला अमित शहांमध्ये देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांची छबी दिसते, असे देखील ठाकूर यांनी आपले मत मांडले.
देशाच्या राजकीय सुरक्षेसाठी त्यांनी कलम 370 (Article 370) आणि 35A काढत देशाची सुरक्षा आणखी मजबूत केली. सरदार पटेलांनी भारताला अखंड ठेवले. तसेच अमित शहा यांनी देखील कलम 370 रद्द करत भारताला अखंड ठेवले आहे.
सरदार पटेलांनी देशाला एकसंध केले आणि आता अमित शहा तो मजबूत करीत आहेत, असे ठाकूर म्हणाले. यावेळी अमित शहा यांनी देखील भाषण केले. यावेळी त्यांनी देशाला महान बनवायचे असल्यास भारताच्या महान इतिहासाचा अभ्यास तरुण पिढीपर्यंत पोहोचविला पाहिजे आणि त्यांच्या मनात देशाबद्दल अभिमान निर्माण केला पाहिजे, असे म्हंटले.
महत्वाच्या बातम्या –
ICICI आणि PNB बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!
मोठी बातमी! शरद पवारांपाठोपाठ अजित पवारांनाही धक्का
शिंदेंच्या बंडखोरीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची बातमी!
“मुख्यमंत्री अनेक दिवस नीट झोपलेले नाहीत, ते रात्री…”
गोपीचंद पडळकरांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक, उचललं मोठं पाऊल