एसटी बसचा चक्काचूर!, काळजाचा थरकाप उडवणारा अपघात

बीड | आज सकाळी लातूर-अंबाजोगाई रोड वर ते बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण जखमी झालेत.

बर्दापूर फाट्याच्या नजीक एका वळणावरती हा भीषण अपघात झाला हा अपघात नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही मात्र हा अपघात इतका भीषण होता की जागीच सहा जणांचा मृत्यू झाला आहे आणि इतर गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात इतका भीषण होता की, एसटी बस आणि ट्रकचा एक-एका भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी सुद्धा झाली आहे.

रस्त्याच्या दोन्ही बाजुंना वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचं पहायला मिळत आहे. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळच्या सुमारास दाट धुके होते आणि त्यासोबतच गाडीचा वेगही अधिक होता त्यामुळे हा अंदाज झाला असावा असं बोललं जात आहे.

या अपघाताची माहिती मिळताचा स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान,  हा अपघात इतका भीषण होता की, त्यात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

बाहुबली फेम कट्टपालाही झाली कोरोनाची लागण, अभिनेते सत्यराज रूग्णालयात दाखल 

संसदेत कोरोनाचा उद्रेक, तब्बल ‘इतक्या’ जणांना कोरोनाची लागण

‘नो व्हॅक्सिन नो जॉब’; ‘या’ कंपनीने घेतला मोठा निर्णय

सावधान! Omicron ची लागण झालेल्या रूग्णांमध्ये दिसतायेत ‘ही’ गंभीर लक्षणं

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय!