कोल्हापूर | आपल्या मायबोलीतून, बोलीभाषेतून कोरोनापासून कसं वाचायचं, कोरोनाला हरवण्यासाठी काय केलं पाहिजे, या आणि अशा अनेक प्रश्नांची शाळा कोल्हापूरजवळच्या एका गावातील शेतात भरली. उसाच्या शेतात काम करत असताना चार ते पाच महिलांनी एकत्र येत कोरोनावर गीत गायलं. याच गीताचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
देशात कोरोनाचा संसर्ग अधिक फैलावू नये, यासाठी मोदी सरकारने लॉकडाऊन केला. नागरिकांना घरात राहण्याचं आवाहन केलं. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे वारंवार जनतेसमोर येऊन कोरोनाला आपण हरवणारच, अशी प्रतिज्ञा करत आहेत. तसंच तुमच्या साथीने आपण ही प्रतिज्ञा करतोय, असं म्हणत लोकांच्या मनात प्राण फुंकत आहेत, याच भावना गीताच्या माध्यमातून महिलांनी सर्वांसमोर मांडल्या आहेत.
कसा कोरोना-कोरोना रोग ह्यो आला… मोदी सरकारने लॉकडाऊन केला…. उद्धव ठाकरेंनी आधार दिला… तुम्ही तोंडाला मास्क बांधा… सॅनिटायझरने हात धुवा… घरात सुरक्षित राव्हा… असे या गीताचे बोल आहेत. तसंच सरकारने केलेलं काम आणि प्रशासन करत असलेलं आवाहन आपल्या गीतामधून त्यांनी सोप्या शब्दात लोकांसमोर मांडलं आहे.
नागरिकांनी कोरोनाला हरवण्यासाठी मास्क घालणं गरेजंच आहे. तसंच सॅनिटायझरने सतत हात धुणे गरजेचे आहे, असं त्या शेतातल्या बायका सांगत आहेत..एका छोट्याशा गीतातून किती मोठं प्रबोधन होऊ शकतं, याचा उत्तम नमुना महिलांनी दाखवून दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कोरोनाला हरवायचंय, पाहा WHO ने काय सांगितलाय जालीम उपाय
-लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय
-“आघाडीचं सरकार चालवणं ही तारेवरची कसरत आहे”
-‘दारुला परवानगी, मॉर्निंग वॉकला का नाही?’; पुण्यातील रहिवाशाचं आयुक्तांना पत्र
-‘अनुजने माझी मान अभिमानाने उंचावली’; शहीद मेजर अनुज सूद यांना अखेरचा निरोप