युरोपियन संसदेत युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना स्टँडिंग ओवेशन, टाळ्यांचा कडकडाट थांबेना; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | रशिया आणि युक्रेन यांच्यात घनघोर युद्धाला आता सहा दिवस होत आले आहेत. रशियाने आक्रमक कारवाई करत युक्रेनच्या अनेक शहरांवर हल्ले केले आहेत.

बलाढ्य अशा रशियाने युक्रेनला एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला होता. तरी देखील युक्रेनने रशियन सैन्याचा मुकाबला केला. अशातच आता युक्रेनला युरोपियन युनियनची साथ मिळाली आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी आज युरोपियन संसदेच्या विशेष बैठकीसमोर भाषण केलं. त्यांनी व्हिडीओ काँन्फरेसिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

आम्ही आमच्या जमिनीसाठी आणि आमच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत. आमची सर्व शहर आता बंद झाली आहेत. पण तरी देखील कोणीही आम्हाला तोडू शकत नाही, असं वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.

आम्ही युक्रेनचे नागरिक आहोत आणि आमच्या मुलांना जिवंत ठेवण्याची आमची रास्त इच्छा आहे. काल इथं एका हल्ल्यात 16 मुलं मारली गेली. मला त्यांना विचरायचंय नेमकी कोणत्या प्रकारची लष्करी कारवाई करत आहेत?, असंही ते यावेळी म्हणाले.

आम्ही युरोपियन युनियनला जोडले गेलो तर ते अजून सक्षम होईल. पण तुमच्याशिवाय युक्रेन एकटं पडेल. आम्ही आमचं कर्तृत्व सिद्ध केलंय, असंही राष्ट्राध्यक्षांनी यावेळी म्हटलं आहे.

आमच्या हक्कांसाठी, आमच्या स्वातंत्र्यासाठी, आयुष्यासाठी आणि आम्ही जिवंत राहण्यासाठी लढतोय, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

आता तुम्हाला युक्रेनला मदत करून सिद्ध करायचंय की तुम्ही खऱ्या अर्थाने युनियन आहात. मग जीवन हे मृत्यूसमोर विजयी होईल. प्रकाशाचा अंधारावर विजय होईल, असं राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले.

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांच्या भाषणानंतर युरोपच्या संसदेत एकच टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. संसदेतले सर्व सभासद उठून उभे राहिले आणि त्यांनी टाळ्यांच्या कडकडाट झाला.

पाहा व्हिडीओ-

महत्त्वाच्या बातम्या – 

पोस्टाची भन्नाट योजना! खातं उघडल्यावर मिळणार दरमहा ‘इतके’ हजार रूपये

मोठी बातमी! रशिया-युक्रेन युद्धादरम्यान एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

 मोठी बातमी! रशियाविरोधात अमेरिका आक्रमक; उचललं मोठं पाऊल

“चिखल फेकणाऱ्यांचे हात किती बरबटलेले, हे सुद्धा देशाला कळायला हवं” 

पुतिन यांचा अमेरिकेला झटका; घेतला हा मोठा निर्णय