Top news देश राजकारण

नरेंद्र मोदींची मोठी घोषणा! इंडिया गेटवर उभारणार सुभाष बाबूंचा भव्य पुतळा

narendra modi 1 e1642761088829
Photo Courtesy- Facebook/ narendramodi

नवी दिल्ली | सुमारे 150 वर्षांच्या गुलामीनंतर भारताला अथक परिश्रमाच्या आणि अगणित त्यागाच्या बळावर स्वातंत्र्य मिळालं. देशाच्या स्वातंत्र्यात भारतीयांच्या मनात नवचैतना जागवणारे नेते होऊन गेले.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी जहालवादी आणि मवाळवादी गटांनी आपापलं योगदान दिलं आहे. इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी हातात शस्त्र घेण्याचं काम करणारे क्रांतिकारक देशानं पाहिले आहेत.

‘तुम मुझे खुन दो मैं तुम्हे आझादी दुंगा’, असं म्हणत देशवासियांना इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात उभा करणारे आझाद हिंद सेनेचे संस्थापक सुभाषचंद्र बोस हे महान नेते होते.

जगातील हिटलरसारख्या नेत्याला देखील बोस यांच्या व्यक्तिमत्त्वानं आकर्षित केलं होतं. देशाच्या स्वातंत्र्यात आणि नागरिकांच्या मनात देशभक्ती जागवण्यात मोठं योगदान आहे.

देश त्यांच्या योगदानाला कधीच विसरू शकत नाही. अशात त्यांच्या देशभक्तीची आठवण म्हणून देशाच्या प्रमुख ठिकाणी म्हणजेच इंडिया गेटवर सुभाष बाबूंचा मोठा पुतळा उभारण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.

नरेंद्र मोदींनी ट्विट करत ही माहिती देशाला दिली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीच्या निमीत्तानं देशाला ही आनंदाची बातमी देत असल्याचं मोेदी म्हणाले आहेत.

देशाच्या सुरक्षेत महत्त्वाचं योगदान असणाऱ्या सैनिकांच्या आठवणीत इंडिया गेटवर अमर ज्योती सतत जळत असायची तिची जागा बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. यावरून देशात राजकारण पेटलं आहे.

नॅशनल वाॅर मेमोरियल उभारल्यानंतर जवानांच्या आठवणीत आता त्याठिकाणी अमर ज्योती जळत राहणार आहे. परिणामी आता इंडिया गेटवर सुभाष बाबूंचा ग्रेनाईटचा पुतळा उभारण्यात येणार आहे.

दरम्यान, नेताजींच्या जयंतीदिवशी म्हणजेच 23 जानेवारीला इंडिया गेटवर या पुतळ्याच्या प्रतिकृतीचं अनावरण करण्यात येणार आहे. परिणामी देशाला आता सुभाष बाबूंचा देखील भव्य पुतळा पाहता येणार आहे.

पाहा ट्विट – 

महत्त्वाच्या बातम्या – 

 शरद पवार म्हणतात, “भाजपवाले कधीपासून गांधीवादी झाले…”

 …तर संपत्तीवर मुलींचा पहिला अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

  Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर

  धक्कादायक! कोरोना लसीचे तब्बल ‘इतके’ डोस घेतल्यामुळे आजोबांवर FIR दाखल

  5 वर्षाखालील मुलांनी मास्क लावावं की नाही?; केंद्र सरकारनं जारी केले नवे नियम