गावांनूसार अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या रूढी-पंरपरा वेगवेगळ्या असतात. त्यातील काही परंपरा या अनेक वर्षानूवर्षांपासून चालत आलेल्या असतात. त्यातील काही परंपरांमागे काही लॉजिक किंवा काही कारणं असतं. तर काही परंपरांमाध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नसतं.
जगामध्ये अशा अनेक ठिकाणच्या वेगवेगळ्या परंपरा आपल्याला बघायला मिळतात. परंतू त्यातील काही परंपरा ऐकल्यावर आपल्याला ध.क्का बसू शकतो.
ब्रिटनमधी अशाच एका गावात कपडे न घालण्याची परंपरा सुरू आहे. ही परंपरा तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. हो ब्रिटनमधील त्या गावात कपडे न घालण्याचीच परंपरा आहे. तुम्ही असं म्हणाल की, त्या ठिकाणच्या माणसांची परिस्थिती बिकट असेल, त्यांच्याकडे पैसे नसतील. तर तुमचा अंदाज साफ चुकीचा आहे.
त्या गावातील लोकांची आर्थिक परिस्थीती चांगली आहे. तरीही त्या गावातील सगळी लोक कपडे घालत नाहीत. यूरोपच्या ब्रिटनमधील हर्टफोर्डशायर येथील स्पिलप्लाटज हे गाव आहे. या गावातील लोक गेल्या 85 वर्षांपासून कपडे घालत नाहीय.
या गावतील सर्व लोक सुशिक्षित असून त्यांच्याकडे चांगल्या प्रकारची मालमत्ताही आहे. तरीही या गावातील मुलं, जेष्ठ नागरीक, महिला, पुरूष, सर्वजण कपडे न घालता गावामध्ये वावरत असतात. असं करताना तेथील लोकांना कोणत्याही प्रकारची लाज किंवा संकोच वाटत नाही.
तसेच गावातील काही लोकांना समान, साहित्या शहरातून आणायचे असल्यास त्यावेळी त्यांना कपडे घालायची मुभा देण्यात आली आहे. मात्र तो व्यक्ती परत गावात प्रवेश करताना त्याने त्याच्या अंगावरील सर्व कपडे उतरवूनच आलं पाहिजे. नाहीतर त्या व्यक्तीला त्या गावात प्रवेश दिला जात नाही.
त्याचप्रमाणे यूरोपमध्ये ज्यावेळी थंडीचे दिवस असतात, त्यावेळीही या गावातील लोकांना कपडे घालण्याची परवानगी दिली आहे. कोणत्याहा कारणासाठी एखाद्या व्यक्तीला कपडे घालण्याची इच्छा झाली, तर तो व्यक्ती कपडे घालू शकतो. या गावातील लोकांना या परंपरेची सवय झाली आहे. काही गावातील मंडळींनी या परंपरेला सुरूवातीला वि.रोध दर्शविला होता. परंतू नंतर तो बंद झाला.
एक अहवालानूसार स्पिलप्लाटज या गावाचा शोध इसुल्ट रिचर्डसन यांनी 1929 साली लावला. त्यानंतर त्यांनी झगमगत्या जीवनापासून दूर राहून गावात सगळं जीवन व्यतीत करण्याचं ठरवलं. विशेषबाब म्हणजे जे पर्यटक या गावात येतात, त्यांनाही ही परंपरा लागू आहे. म्हणजे पर्यटकांनी कपडे काढले तरच त्यांना त्या गावात प्रवेश दिला जाईल.
महत्वाच्या बातम्या-
IPL 2021: पहिल्या सामन्याआधी विराट कोहलीचा चाहत्यांना खास…
काळजी घ्या! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत समोर आली…
मुव्ही माफियांच्या भितीनं ‘या’ अभिनेत्यानं केला…
‘या’ चित्रपट दिग्दर्शकाच्या पत्नि आणि मुलीची…
इंधन कंपन्यांच्या ‘या’ मोठ्या निर्णयाने…