एक नारी सब पर भारी ! महिलेनं साडीवर केले खतरनाक स्टंट, पाहा व्हिडीओ

मुंबई | आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

अनेकांना साडी घालून काम करताना अनेक अडचणी येतात. उठणं-बसतानाही त्यांच्या नाकी नऊ येतात. मग तर साडी घालून स्टंटबाजी करणं तर खूपचं अवघड, अवघड काय अशक्यच गोष्ट असल्याचं काहींना वाटतं. परंतू आपण साडी घालूनही जबरदस्त स्टंट करू शकतो हे एका महिलेनं सिद्ध केलं आहे.

डान्सर रूक्मिणी विजयकुमारने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरू एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये ती साडी घालून स्टंट करताना दिसत आहे.

अगदी जीम किंवा योगा करण्यासाठी आपण जे कपडे घालतो. त्यातही आपल्याला स्टंट करणेही कठीण आहे. इथं तर त्या व्हिडीओमध्ये रूक्मिणी साडीवर स्पिलट्स आणि बॅकफ्लिप करताना दिसतं आहे. तसं पाहायला गेलं तर स्टंट करणं हे आव्हानच असतं आणि त्यात ते स्टंट साडी घालून करायचे म्हणल्यावर तर आणखीणच अवघड. मात्र रूक्मिणी ते अगदी सहजरित्या करत असल्याचं आपल्याला व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे.

मागिल वर्षी रूक्मिणीने योगदिना दिवशी साडीवरील स्टंटचा व्हिडीओ शेअर केला होता. त्याच व्हिडीओमधील हे काही सीन्स असल्याचं रूक्मिणीने सांगितलं आहे. तसेच या व्हिडीओच्या बॅकराऊंडला शिव तांडव सुरू आहे.

हा व्हिडीओ पोस्ट करताना रूक्मिणीने ‘The things we can do in a well draped saree’  असं कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, या व्हिडीला आतापर्यंच जवळजवळ 95 हजार लाईक्स आले आहेत. तसेच हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी रूक्मिणीचं कौतुकही केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rukmini Vijayakumar (@dancerukmini)

महत्वाच्या बातम्या-

जंगल सफारी करताना अचानक गाडीतच शिरला सिंह अन्…, पाहा…

प्रेग्नन्सीच्या आठव्या महिन्यात महिलेने असं काही केलं की…

सेम टू सेम! करिश्मा कपूरसारख्या दिसणाऱ्या ‘या’…

गुढीपाडव्याच्या निमित्तानं राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर,…

‘बहु हमारी रजनीकांत’ फेम ‘या’…