“शिंदे-फडणवीसांचं सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच”

मुंबई | शिवसेनेचे माजी मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. शिवसना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून आलेलं सरकार फार काळ टीकणार नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

शिंदे गटातील लोकांनी पक्षाशी किंवा शिवसेना प्रमुखांशी गद्दारी केली नाहीतर माणुसकीशी गद्दारी केली आहे, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली.

महाराष्ट्रात पूर आलाय पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे मित्र दिल्लीत बसलेत. तिकडून त्यांची वेगळीच कामं सुरू आहेत. तसेच युवासेनेला धमकी द्या कोणी येतंय का पाहा. महाविकास आघाडीला धमकी द्या कोणी येतंय का पाहा, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.

चांगल्या लोकांना राजकारणात स्थान नसतं. गद्दारी झाली झाली आहे पण ही राजकीय गद्दारी नाही. तर ही माणुसकीशी गद्दारी झाली आहे. पक्षप्रमुख बेडवर असताना मी मुख्यमंत्री होऊ शकतो असा विचार केला. याला निष्ठा म्हणायची का?, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.

बंड करायला हिम्मत लागते. महाराष्ट्रात राहुल बंड करण्याची हिम्मत दाखवायची होती. आता हिम्मत असेल तर निवडणुकीला सामोरं जा. जनता जे ठरवेल ते आम्हाला मान्य असेल. जर तुम्हाला परत यायचं असेल तर तुमच्यासाठी मातोश्रीची दारं उघडी आहेत, असंही  आदित्य ठाकरे म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

“एकनाथ शिंदेंनी निवडणूक लढवली तर बापाचं नाव लावणार नाही”

आदित्य ठाकरेंचा भर पावसात कार्यकर्त्यांशी संवाद, शरद पवारांच्या ‘त्या’ सभेची करून दिली आठवण

हॉटेलमधील ‘तो’ व्हिडीओ शेअर करताच नाना पटोले चित्रा वाघ यांच्यावर बरसले, म्हणाले…

पंधरा वर्षांपूर्वीही आजच देशाला मिळाल्या होत्या पहिल्या महिला राष्ट्रपती, मुर्मू इतिहासाची पुनरावृत्ती करणार?,

शरद पवार अॅक्शन मोडमध्ये, राष्ट्रवादीचे सर्व विभाग व सेल बरखास्त