मुंबई | आदित्य ठाकरेंनी आम्हाला निधी दिला नाही. त्यांनी माझ्या काही प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. त्यांनी उत्तरे दिली तर मी तात्काळ आमदारकीचा राजीनामा देईन, असं आव्हानच शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी दिलं होतं. तसेच आदित्य ठाकरे यांना भेटून जाब विचारणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांनी ही कांदे यांच्यावर पलटवार केला आहे.
मी गद्दारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देणार नाही. कारण गद्दारांना प्रश्न विचारायचा अधिकार आणि त्यांची तेवढी लायकीही नसते, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदार सुहास कांदेंना प्रत्युत्तर दिलंय.
ज्या माणसाने आपल्याला ओळख दिली, कठीण काळात आपल्याला साथ दिली, तुम्हाला तिकीट दिलं, तुमच्यासाठी प्रचार केला, त्याच्यात पाठीत तुम्ही खंजीर का खुपसला, या प्रश्नाचे उत्तर मला द्या, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.
चांगला मुख्यमंत्री, चांगला माणूस, बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपूत्राला खुर्चीवरून बाजूला करून त्याठिकाणी आपण बसायचे, गद्दारी करायची, त्यांच्या पाठीत खंजीर का खुपसायचा, हा विचार त्यांच्या मनात का आला असेल, हाच प्रश्न मला परतपरत पडतो. त्यांचा नेमका विचार काय असेल, ते मला कळत नाही, असंही ते म्हणालेत.
दरम्यान, आदित्य ठाकरेंची भेट घेणार असल्याचं कांदेंनी सांगितल्यानं आदित्य ठाकरेंच्या समर्थनासाठी जमलेले शिवसैनिक संतप्त झालेत.
मनमाड येथील मेळाव्यात आदित्य ठाकरेंचा सामना करायला निघालेल्या आमदार सुहास कांदे यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. पिंपळगाव टोल नाक्यावर शिवसैनिक आणि आमदार सुहास कांदे आमने सामने आले आहेत. तसेच कांदेंना भेटायचं असेल तर त्यांनी मातोश्रीवर यावं, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘एकनाथ शिंदेंच्या हत्येचा कट होता, तरीही…’; बंडखोर आमदाराच्या आरोपाने खळबळ
“उद्धव ठाकरेंनी वडिलांचा 90% पक्ष संपवला, आदित्यने ठरवलं पप्पा उरलेला 10% मी संपवणार”
विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस पुन्हा कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना इशारा जारी
आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
रणवीर सिंगच्या न्यूड फोटोजने सोशल मीडियावर आग, चर्चा तर होणारच; पाहा फोटो