IPL 2022: ना रोहित, ना विराट! आकाश चोप्रा म्हणतो ‘हा’ खेळाडू ऑरेंज कॅप जिंकणार

नवी दिल्ली | क्रिकेटच्या सर्वाधिक रोमांचकारी स्पर्धेला आता काही दिवसांमध्ये सुरूवात होणार आहे. आयपीएलची (IPL 2022) सुरूवात 26 तारखेपासून होईल.

आयपीलच्या सुरूवातीची सर्वजण उत्सुकतेनं वाट पाहात आहेत. प्रत्येक संघ आता आपापली रणनिती बनवण्यात व्यस्त आहेत.

यावर्षी आयपीएलमध्ये अधिक रोमांच पाहायला मिळणार आहे कारण तब्बल 10 संघांचा समावेश असणारी ही स्पर्धा आतापर्यंतची सर्वात मोठी स्पर्धा असणार आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्याला ऑरेंज कॅप तर सर्वाधिक बळी घेणाऱ्याला पर्पल कॅपचा मान मिळतो. परिणामी क्रिकेट समालोचक आतापासून नाव जाहीर करत आहेत.

प्रसिद्ध क्रिकेट समालोचक आकाश चोप्रांनी यावर्षीच्या ऑरेंज कॅपसाठी भारतीय फलंदाज शिखर धवनच्या नावाचा उल्लेख केला आहे.

माझ्या मते, शिखर धवन हा पंजाब किंग्स संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. इतकंच नाही तर तो स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणार फलंदाज देखील असेल, असं आकाश चोप्रा म्हणाले आहेत.

आश्चर्याची गोष्ट आहे की, चोप्रानं विराट कोहली, रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल यांची नाव ऑरेंज कॅपसाठी घेतली नाहीत.

दरम्यान, गत हंगामात शिखर धवन दिल्लीकडून खेळला होता. मेगा लिलावात पंजाब संघानं त्याला खरेदी केलं आहे. परिणामी पंजाबला त्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

Deltacron: काळजी घ्या! महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे संशयित रूग्ण सापडले

 “भारतातल्या स्युडो सेक्यूलर जमातीने…”, The Kashmir Files वर बोलताना फडणवीसांची बोचरी टीका

Sharad Pawar: शरद पवार म्हणतात, “ऊसाचं बिल कर्ज काढून नव्हे, तर माल विकून द्या”

Nitin Gadkari: “60 किलोमीटर अंतरावर…”, नितीन गडकरींची लोकसभेत मोठी घोषणा

चीनमध्ये कोरोनाचं थैमान! सरकारच्या ‘या’ आदेशाने लोकांमध्ये भीतीचं वातावरण