Top news देश

पिठाच्या पिशव्यांमधून गरिबांना खरंच 15 हजार रुपये वाटले का?; आमिर खाननं स्वतः केला खुलासा

मुंबई | कोरोनाविरोधात सध्या संपूर्ण देश लढत असताना बॉलिवूड सेलिब्रेटी देखील आपापल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र काही समाजकंटकांकडून खोटे मेसेज व्हायरल केले जात आहेत. असाच प्रकार अभिनेता आमीर खानसोबत घडला आहे.

आमिर खानच्या नावाने गेल्या काही दिवसांपासून एक मेसेज व्हायरल केला जात आहे. आमिरनं पिठाच्या पिशवीतून गरिबांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत केली, असा तो मेसेज आहे, मात्र हा मेसेज खोटा असल्याचं खुद्द आमिर खाननं सांगितलं आहे.

‘पिठाच्या पिशवीत पैसे वाटणारी ती व्यक्ती मी नाही. व्हायरल होणारी ही माहिती एक तर खोटी असावी किंवा कोण तरी दानशूर रॉबिन हूड असावा ज्याला आपली ओळख सांगायची नाहीए’, असं आमिरनं त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आमिरच्या नावाने व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये काय म्हटलं होतं?

एका गरीब वस्तीमध्ये मध्यरात्रीच्या वेळी पिठाच्या पिशव्यांनी भरलेला ट्रक आला. ज्यांना पिठाची गरज आहे, अशा गरजूंना पिठाच्या पिशव्या देण्यात आल्या. अर्ध्या किलोच पीठ दिलं जात होतं, त्यामुळे फक्त गरज असलेले लोकच पीठ घ्यायला आले. लोकांनी घरात गेल्यावर उघडून पाहिलं तर त्यात १५ हजार रुपये निघाले. हा मदत करणारा दुसरा तिसरा कोण नसून अभिनेता आमिर खान आहे, असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला होता.

आमिर खाननं ट्विटमध्ये काय म्हटलंय?

 

महत्वाच्या बातम्या-

-“भारतात कोरोनाचा संसर्ग लवकरच आटोक्यात येईल”

-मजुरांच्या घरी जाण्याच्या प्रवासाचा खर्च काँग्रेस करणार; सोनिया गांधींची मोठी घोषणा

-…तर मुंबईतून केंद्र सरकारला जाणारा सगळा कर रोखू; शिवसेना खासदाराचा केंद्र सरकारला इशारा

-“फडणवीस, महाराष्ट्राची बाजू घेण्याऐवजी गुजरातची वकिली करत आहेत हे क्लेशदायक”

-…तर ते या राज्यात राहण्याच्या लायकीचे नाहीत, असंच म्हणावं लागेल- संजय राऊत