Top news मनोरंजन

आमीर खान ‘या’ बड्या अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झाला होता!

मुंबई | बाॅलिवुडची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी आज जरी आपल्यात नसली तरी तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. कोट्यावधी लोकांच्या मनावर श्रीदेवी आजही राज्य करते. ज्याप्रमाणे अनेक चाहते श्रीदेवीचे दिवाणे आहेत तसेच काही सेलिब्रिटीही श्रीदेवीच्या प्रेमात दिवाणे झाले होते.

सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान एकेकाळी श्रीदेवीच्या प्रेमात वेडा होता. याविषयी आमीर खानने स्वतः खुलासा केला होता. श्रीदेवी आणि आमिर खान एका मॅगझिनच्या फोटोशूटसाठी एकत्र आले होते. मात्र, श्रीदेवीला समोर पाहून आमिर खान घाबरून गेला होता.

एका मुलाखती दरम्यान आमिर खानने सांगितले की, मी श्रीदेवीचा खूप मोठा फॅन आहे. ती माझी आवडती अभिनेत्री आहे. जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये नवीन होतो तेव्हा मला एका मासिकासाठी श्रीदेवीजी सोबत शूट करण्यास सांगितले होते. त्यावेळी मी इतका घाबरलो होते ते मी सांगू शकत नाही.

मी विचार करू लागलो की जेव्हा मी त्यांच्या समोर येईन तेव्हा त्या मला दोन सेकंदात ओळखतील की हा मुलगा माझ्यावर प्रेम करतो. त्याचे सौंदर्य पाहून मी त्यांच्यावर फिदा झालो होतो, असं आमीर खानने म्हटलं होतं.

तसेच मासिकाच्या फोटोशूट दरम्यान आमिर खान आणि श्रीदेवी दोघेही बराच काळ एकत्र होते. परंतु आमिर श्रीदेवीच्या नजरेला नजर भिडवून शकला नव्हता, असंही आमीर खानने सांगितलं होतं.

श्रीदेवीने शाहरुख खान आणि सलमान खान सोबत चित्रपटात काम केले आहे. पण तिने आमिर खान बरोबर एकही चित्रपट केलेला नाही. ज्याची आमिर खान अजूनही खंत व्यक्त करतो.

श्रीदेवीचे या जगातून निघून जाणे हा आमिर खानसाठी मोठा धक्का होता. आजही आमीर श्रीदेवीला आठवत दुःखी होतो. आमिर खानच्या म्हणण्यानुसार श्रीदेवी एक हुशार अभिनेत्री होती.

दरम्यान, 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवीने या जगाचा निरोप घेतला होता. श्रीदेवीचा मृ.त्यूच्या बातमीने संपूर्ण जगातील तिच्या चाहत्यांना जणू धक्काच बसला होता. श्रीदेवीचा मृ.त्यू नेमका कशामुळे झाला होता याचा अद्याप नेमकं कारण समोर येवू शकलं नाही. मात्र, प्राथमिक तपासानुसार श्रीदेवीचा गुदमरून मू.त्यू झाल्याचं म्हटलं जातं.

महत्त्वाच्या बातम्या-

‘अल्लाह’साठी चित्रपट सृष्टी सोडणाऱ्या सनाने ‘या’ मौलवींशी निकाह केला, व्हिडिओ व्हायरल

भारतीय टीममध्ये निवड न झाल्यानं संतापलेला सुर्यकुमार रोहितसमोर मन मोकळे करत म्हणाला…

सुशांतच्या 17 कोटींचा घोटाळा आणि दिनेश विजयन यांचा संबंध काय? वाचा सविस्तर

अंकिता पुन्हा सुशांतच्या आठवणींना उजाळा देत टेलिव्हिजनवर सुशांतसाठी करणार ‘ही’ गोष्ट

एकीकडे पत्नी प्रेग्नंट तर दुसरीकडे सैफ अलीच्या मुलासाठी येत आहेत लग्नाचे प्रस्ताव