Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

…म्हणून आमीर खान अभिनेत्रींच्या हातावर थुंकायचा! कारण वाचून तुम्हीही हैराण व्हाल

मुंबई| चित्रपट सृष्टीतील काही कलाकार खूप मेजेशीर आयुष्य जगतात. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान असंच काहीसं आपलं आयुष्य एन्जोय करत असतो. त्याने अभिनयातून नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत आहेतच. परंतु हा प्रसिद्ध अभिनेता जेवढा आपल्या अभिनयासाठी फेमस आहे तितकाच तो खोडकर देखील आहे.

आमीर खान शूटिंग दरम्यान अनेकवेळा सह कलाकारांच्या खोडी काढत असतो. असंच आमिर खान अगोदर आपल्या सह अभिनेत्रींच्या हातावर थुंकायचा. त्यामुळे अनेक अभिनेत्या त्यावर नाराजही झाल्या आहेत.

जुही चावला ही अभिनेत्री आमीरच्या या घाणेरड्या सवयीमुळे त्यावर नाराज  झाली होती. ‘इश्क’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमिरने तीला सांगितले मला जोतिषशास्त्र सांगता येते. जुहीनेही पटकन आपला हात पुढे केला. पण जुहीने हात देताच आमिर तिच्या हातावर थुंकला आणि तेथून पळाला.

आमिरने अशी खोड केली आणि त्याचा राग जुही चावला आला. जुहीला खूप वाईट वाटलं होतं म्हणून तिने लगेच सेट सोडला आणि दुसर्‍या दिवशी ती शूटवरही आली नाही. आमिरलाही जूहीच्या नाराजीबद्दल वाईट वाटले. त्यानंतर ते  दोघेे बरीच वर्ष बोलत नव्हते.

18 व्या मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये आमिरच्या या सवयीबद्दल ‘जो जीता वही सिकंदर’ ची पुनर्मिलन चर्चा झाली. त्यावेळी फराह खान देखील म्हणाली होती की, आमिर सुरुवातीला आपल्या सह अभिनेत्रींच्या हातावर थुंकायचा.

दरम्यान, बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक गल्ला जमावणाऱ्या चित्रपटांच्या यादीत जास्तीत जास्त चित्रपट आमिर खानचे आहेत. परंतु तरी देखील एक असा काळ होता जेव्हा आमिर खान अपयशी होत होता. त्याला वाटत होतं की त्याचं करिअर बरबाद होत चाललंय. या चिंतेत तो रोज घरात बसून रडायचा. याबाबत स्वतः आमिरनेच खुलासा केला होता.

मात्र, अमिर खानने चित्रपट सृष्टीत फेमस होण्यासाठी खूप कष्ट घेतले. त्याचा ‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट यशस्वी झाला. या चित्रपटाच्या यशानंतर त्याने सलग 8 ते 9 चित्रपट साईन केले आणि तो चित्रपट सृष्टीत यशस्वी होत गेला.

आमीर खानने बॉलीवूडमध्ये टिकून राहण्यसाठी स्वतःवर खूप मेहनत घेतली आणि तो चित्रपट सृष्टीत टॉपला पोहचला. आमीर खान अभिनयाबरोबरच सामाजिक कामांमध्ये देखील नेहमीच पुढे असतो. आमिर सतत अनेकांच्या मदतीसाठी धावून जात असतो.

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ बड्या अभिनेत्रीवर आधी चाकूने ह.ल्ला आता जीवे मा.रण्याची धमकी, अभिनेत्रीची मुख्यमंत्र्यांना मदतीसाठी साद

मोठी बातमी! कॉमेडीयन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष ‘या’ प्रकरणी गजाआड

काय सांगता! जगातील एकाही शाकाहारी व्यक्तीला कोरोना झाला नाही?

धक्कादायक! ‘त्या’ मृ.त्यू प्रकरणात राष्ट्रवादीचे नाही तर भाजपचे नेते सामील आहेत?

‘त्या’ बड्या अभिनेत्याची ह.त्याच झाली होती?; मुंबई पोलिसांच्या तपासाला पुन्हा वेग