‘भोंगे उतरवण्याने…’; राज ठाकरेंच्या भाषणानंतर आनंद दवेंचं मोठं वक्तव्य

पुणे | राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या (Aurangabad) आजच्या सभेतही याबाबतचा उल्लेख करत 4 तारखेपासून ऐकणार नाही, असा इशारा राज्य सरकारला दिला आहे. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी भाष्य केलंय. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

रस्त्यावर नमाज पठण चूकच मग गणपती मंदिर, मांडव, उत्सव, मांडवात होणाऱ्या आरती, त्यापण रस्त्यावरच होत असतात. मिरवणूक, दांडिया यांच काय करणार?, असा सवाल दवेंनी राज ठाकरेंना केला आहे.

स्पिकर खाली आलेच पाहिजेत, तर मग हिंदू उत्सवातले स्पिकर काय करणार?, असंही आनंद दवे म्हणालेत.

भोंगे उतरवणे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या काळात सुद्धा शक्य झालं नव्हतं. भोंगे उतरवण्याने सर्वाधिक नुकसान हिंदुत्वाचं होईल, असं दवे म्हणालेत.

प्रत्येक गावाची जत्रा, उरूस, ग्राम दैवत यात्रा, गणपतीचे मिरवणूक सहित 12 दिवस, नवरात्रीचे 10, शिवजयंती, संभाजी महाराज जयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती, प्रत्येक जातीच्या युगपुरुषांचे दिवस, त्यांच्या यात्रा, पाडवा यात्रा, दिवाळी पहाट, दहीहंडी हे सगळंच संकटात येईल, असं आनंद दवे यांनी म्हटलंय.

दरम्यान, सगळ्या हिंदू बांधवांना सांगत आहे. आजही परिस्थिती आहे. आज नाहीतर पुन्हा कधी नाही. ही लोक जर 3 तारखेपासून ऐकली नाही तर पोलिसांकडून परवानगी घेऊन जोरात काम करा, असं राज ठाकरे म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

राज ठाकरेंच्या भाषणावर इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया, म्हणाले… 

भोंग्याच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंचा सरकारला गंभीर इशारा, म्हणाले… 

  “शरद पवार नास्तिक आहेत म्हटलं तर त्यांना झोंबल आणि….” 

  “राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात दुसऱ्या जातींबद्दल द्वेष सुरु झाला” 

  “कोणी गोंधळ करायला आलं असेल तर तिथंच हाणा”; राज ठाकरे भर सभेत भडकले